शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

गडकरी लवकरच मोठी घोषणा करणार?; वाहतुकीचा चेहरामोहरा बदलणार, प्रदूषण घटणार, पैसेही वाचणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2020 10:01 AM

देशातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचं आधुनिकीकरण केलं जाणार असल्याचं संकेत

नवी दिल्ली: देशातील वाढतं प्रदूषण, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतल्या समस्या दूर करण्यासाठी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी लवकरच महत्त्वाची घोषणा करण्याची शक्यता आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या आधुनिकीकरणाचे संकेत गडकरींनी दिले आहेत. नव्या वाहतूक व्यवस्थेत सीएनजी, इलेक्ट्रिक वाहनांवर भर असेल. यामुळे इंधनाची बचत होईल. त्यामुळे वाहतूक खर्च कमी होईल. याशिवाय प्रदूषणही रोखता येईल...अन् गडकरींनी 'ते' शब्द खरे करून दाखवले; चीनला जबरदस्त दणकासार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमुळे खर्च कमी होईल. अक्षय ऊर्जा आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरावर भर दिला जाईल, अशी माहिती गडकरींनी दिली. इलेक्ट्रिक, सीएनजीवर चालणाऱ्या गाड्यांचा वापर झाल्यास खनिज तेलाची आयात कमी होईल. त्यामुळे बराचसा खर्च वाचेल, असंदेखील ते पुढे म्हणाले. यावेळी त्यांनी नागपूरमध्ये करण्यात आलेल्या प्रयोगांचा विशेष उल्लेख केला. 'नागपुरात ४५० बसेस जैवइंधनावर धावणार आहेत. तशी योजना आखण्यात आली आहे. त्यातील ९० बसेस जैवइंधनावर धावू लागल्या आहेत,' अशी माहिती त्यांनी दिली....तर देशात 5 कोटी नोकऱ्या तयार होतील आणि हेच आमचं लक्ष्य; गडकरींनी सांगितला सरकारचा प्लॅनजैवइंधनावर धावणाऱ्या बसेसमुळे मोठ्या प्रमाणात पैशांची बचत होत असल्याचं गडकरींनी सांगितलं. 'डिझेलवर चालणाऱ्या बसेसवर वर्षाकाठी ६० कोटींचा खर्च येतो. सीएनजीवर चालणाऱ्या बसेसमुळे आर्थिक बचत होते. याशिवाय सांडपाण्यापासून सीएनजी तयार करता येतो का, यावरही काम सुरू आहे,' अशी माहिती त्यांनी दिली. ग्रीन हायवेजच्या बाजूने जाणार हायस्पीड ट्रेन, दिल्ली-मुंबई, मुंबई-नागपूरचा समावेशसार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी लंडन बस मॉडेल राबवण्याची आवश्यकता असल्याचं गडकरी म्हणाले. बस सेवा देणाऱ्यांनी डबल डेकर बस चालवाव्यात. त्यात आधुनिक सुविधा द्याव्यात. त्यामुळे प्रवासी संख्या वाढण्याची शक्यता वाढेल, असं गडकरींनी म्हटलं.४०० वर्ष जुना वटवृक्ष वाचवण्यासाठी राष्ट्रीय महामार्गाचा नकाशा बदलला; मंत्री नितीन गडकरींचे आदेश

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरी