‘एनआयटी’ची वेबसाइट पाकिस्तानकडून हॅक
By Admin | Updated: June 7, 2017 00:12 IST2017-06-07T00:12:32+5:302017-06-07T00:12:32+5:30
काश्मीर समर्थक घटकांनी येथील प्रतिष्ठित नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीची (एनआयटी) वेबसाइट मंगळवारी हॅक केली.

‘एनआयटी’ची वेबसाइट पाकिस्तानकडून हॅक
श्रीनगर : काश्मीर समर्थक घटकांनी येथील प्रतिष्ठित नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीची (एनआयटी) वेबसाइट मंगळवारी हॅक केली. स्वत:ला पाक सायबर स्कल्ज संबोधणाऱ्या हॅकर्सनी ‘काश्मीरला स्वतंत्र करा, स्वातंत्र्य हे आमचे ध्येय आहे,’ असा संदेश या वेबसाइटवर पोस्ट केला आहे. तथापि, वेबसाइट आता दुरुस्त करण्यात आली असून, त्यावरील हा संदेश हटविण्यात आला आहे, असे सूत्रांनी सांगितले.
‘तुम्हाला का हॅक करण्यात आले हे तुम्हाला ठाऊक आहे का? स्वतंत्र काश्मीर... स्वातंत्र्य हे आमचे ध्येय आहे’, असा संदेश हॅकर्सनी या वेबसाइटवर टाकला असून, याच्याशी मिळतेजुळते संदेश टाकले.