निरुपा रॉय राहणार शौचालय बांधणा-या मुलासोबत ! मोदींनी दिली दाद
By Admin | Updated: April 12, 2017 16:40 IST2017-04-12T12:45:58+5:302017-04-12T16:40:25+5:30
"स्वच्छ भारत" अभियान सुरु केल्यापासून लोकांना या मोहिमेशी जोडण्यासाठी वेगवेगळया कल्पक पद्धतीने या अभियानाचा प्रचार, प्रसार सुरु आहे.

निरुपा रॉय राहणार शौचालय बांधणा-या मुलासोबत ! मोदींनी दिली दाद
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 12 - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "स्वच्छ भारत" अभियान सुरु केल्यापासून लोकांना या मोहिमेशी जोडण्यासाठी वेगवेगळया कल्पक पद्धतीने या अभियानाचा प्रचार, प्रसार सुरु आहे. आता अमिताभ बच्चन आणि शशी कपूर यांच्या गाजलेल्या "दीवार" सिनेमाच्या पोस्टरमधून घरात शौचालय बांधण्याचा संदेश देण्यात आला आहे.
खुद्द पंतप्रधान मोदींनी या कल्पकतेला दाद दिली आहे. मोदींच्या एका फॉलोअरने त्यांना हा फोटो टि्वट केला. ज्याला मोदींनी सुद्धा दाद दिली. 1975 साली गाजलेल्या दीवार सिनेमाच्या एका पोस्टरवर अमिताभ आणि शशी कपूरच्या मध्ये आई निरुपा रॉय उभी आहे.
आईला आपल्यासोबत ठेवण्यासाठी विजय आणि रवीचा संघर्ष सुरु असतो. त्यावेळी आई प्रामाणिक रवीची निवड करते. पण या पोस्टरमध्ये आईचा प्राधान्यक्रम बदलला आहे. जो पहिले शौचालय बांधणार त्याच्यासोबत मी रहाणार असे आई या पोस्टरमध्ये सांगताना दिसत आहे. लोकांनी घरात शौचालय बांधावे यासाठी नैनीताल नगर परिषदेने हा पोस्टर लावला आहे.