शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: रशियाच्या समुद्राखाली शक्तीशाली भूकंप! कुरील आयलंडवर त्सुनामी; अमेरिका, जपान, न्यूझीलंडसह जगाला धोका
2
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारताने लवकर व्यापार करार करावा, अन्यथा २५% टॅरिफ लादू! डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा धमकी
5
लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
6
एकही चूक न करायच्या अटीवर कोकाटेंना अभय, मंत्रिपद टेम्पररी, दर १५ दिवसांनी आढावा: अजित पवार
7
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
8
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार
9
ठाकरे बंधुंना सलामी दिली, प्रो-गोविंदा स्पर्धेतून बाहेर; जय जवान पथक व्यवस्थापकांचा आरोप
10
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरूद्ध अनिल परबांनी दिले पुरावे; CM फडणवीसांकडे सादर
11
आजी-माजी खासदार आमने-सामने; विचारेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; तर म्हस्के ‘वाचाळ रत्न’!
12
गणेशोत्सवासाठी ST सज्ज; ५,२०० जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू, मुंबईतून ६०० बस
13
उंचीच्या सक्तीमुळे उडणार मंडळांची धांदल; दोन विसर्जनस्थळे गाठण्यासाठी कसरत
14
वसई-विरार पालिकेचे माजी आयुक्त ईडीच्या कचाट्यात; सोमवारी निरोपाचा सत्कार, मंगळवारी धाड
15
लोकलमध्ये बसल्यावर मिळते तिकीट; UTSचा गैरवापर, QR कोड सुविधा बंद करण्यासाठी रेल्वेला पत्र
16
AI, कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या साडेचार हजार जागा वाढल्या; प्रवेशासाठी १ लाख ७६ हजार जागा
17
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
18
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
19
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
20
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी

निर्मला सीतारामन जिथे 'निरीक्षक' म्हणून गेल्या, तिथे कसा होता भाजपाचा मुख्यमंत्रीपदाचा फॉर्म्युला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2024 18:23 IST

महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री निवडण्याची जबाबदारी निर्मला सीतारामन यांच्यावर सोपवण्यात आली आहे. सीतारामन यांनी आतापर्यंत ३ वेळा निरीक्षक म्हणून काम पाहिले आहे. त्यावेळी काय घडले... वाचा सविस्तर

Nirmala Sitaraman, Maharashtra CM : महायुतीला मोठे बहुमत मिळाल्यानंतर चर्चेत असलेला प्रश्न म्हणजे महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण होणार? या चर्चांना आता लवकरच पूर्णविराम मिळणार आहे. भारतीय जनता पक्षाने अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांची केंद्रीय निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. निरीक्षकाचे काम विधीमंडळ पक्षाची बैठक घेणे आणि नवीन मुख्यमंत्र्यांची निवड करणे हे असते. भाजपमध्ये मुख्यमंत्र्यांची निवड करण्यात निरीक्षकांचा मोठा वाटा असतो. महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री निवडण्याची जबाबदारी निर्मला सीतारामन यांच्यावर सोपवण्यात आली आहे. सीतारामन यांनी आतापर्यंत ३ वेळा निरीक्षक म्हणून काम पाहिले आहे. त्यावेळी काय घडले, हे सविस्तर जाणून घेऊया.

३ पैकी २ वेळा जुन्या चेहऱ्यालाच पसंती

निर्मला सीतारामन यांची गेल्या ७ वर्षात चौथ्यांदा निरीक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे. सीतारामन यांची यापूर्वी २०१७ मध्ये हिमाचल प्रदेश, २०१९ मध्ये हरयाणा आणि २०२२ मध्ये मणिपूरसाठी केंद्रीय निरीक्षक म्हणून निवड झाली होती. २०१७ मध्ये हिमाचल निवडणुकीनंतर जयराम ठाकूर यांची विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत नेतेपदी निवड करण्यात आली. त्यावेळी जेपी नड्डा आणि प्रेम धुमल हे मुख्यमंत्रीपदाचे मोठे दावेदार होते. पण त्यावेळी जयराम यांचे मुख्यमंत्रीपदासाठीचे नाव 'सरप्राईज' होते. २०१९ मध्ये निर्मला हरयाणात निरीक्षक म्हणून गेल्या. येथील विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत जुने मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांची मुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली. तर २०२२ मध्ये निर्मला यांनी एन वीरेन सिंग या जुन्याच नावावर शिक्कामोर्तब केले.

मुख्यमंत्री निवडीसाठी निर्मला कोणता फॉर्म्युला वापरणार, याची आता चर्चा सुरु आहे. महाराष्ट्र निवडणूक निकालानंतर ११ दिवसांनी निर्मला सीतारामन मुख्यमंत्री निवडण्यासाठी मुंबईला येत आहेत. निर्मला यांच्यासोबत विजय रुपाणी यांचीही नियुक्ती केली आहे. रुपाणी यांच्या म्हणण्यानुसार मुख्यमंत्री भाजपकडूनच केले जात आहे.

महाराष्ट्रात तिसऱ्यांदा होणार भाजपाचा मुख्यमंत्री

२०१४ मध्ये पहिल्यांदा भाजपाने महाराष्ट्रात आपला मुख्यमंत्री बनवला. त्यावेळी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली. फडणवीस यांनी २०१४ ते २०१९ हा कार्यकाळ पूर्ण केला. त्यानंतर २०१९ मध्ये पहाटेच्या शपथविधीनंतर फडणवीस दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. पण ते विश्वासदर्शक ठराव जिंकू शकले नाहीत. त्यानंतर आता महाराष्ट्रात तिसऱ्यांदा भाजपाचा मुख्यमंत्री होणार, हे जवळपास निश्चित आहे.

टॅग्स :nirmala sitharamanनिर्मला सीतारामनBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMahayutiमहायुती