शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
2
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
3
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
4
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
5
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
6
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
7
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
8
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
9
विराट-अनुष्काचा मुलगा 'अकाय' कसा दिसतो? टीव्ही अभिनेता आमिर अली म्हणाला...
10
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
11
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
12
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
13
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
14
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
15
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
16
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
17
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
18
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
19
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
20
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात

निर्भया: एक दोषी तिहारमध्ये हलवला; एका आरोपीची सर्वोच्च न्यायालयात याचिका

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2019 1:24 AM

अक्षय कुमार सिंह याने या खटल्यातील चारही दोषींना मृत्युदंडाच्या सुनावण्यात आलेल्या शिक्षेचा फेरविचार करावा, अशी याचिका मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात केली

नवी दिल्ली : निर्भया सामूहिक बलात्कार व हत्या प्रकरणातील दोषींपैकी एक पवन कुमार गुप्ता (२३) याला येथील मांडोली तुरुंगातून तिहार तुरुंगात नुकतेच हलवण्यात आले आहे, असे तुरुंग अधिकाऱ्यांनी मंगळवारी सांगितले.

तिहारच्या तुरूंग क्रमांक दोनमध्ये गुप्ता याला ठेवण्यात आले असून, तेथे याच खटल्यातील दोषी मुकेश सिंह आणि अक्षय यांनाही ठेवण्यात आले आहे, तर आणखी एक दोषी विनय शर्मा याला चार क्रमांकाच्या तुरुंगात ठेवण्यात आले आहे.

१६ डिसेंबर, २०१२ रोजी निर्भयावर (२३) धावत्या बसमध्ये सहा जणांनी (त्यात बसचालक, वाहक आणि मदतनीस सहभागी होते) बलात्कार केला होता व नंतर तिची हत्या केली. निर्भया ही फिजिओथेरपीची प्रशिक्षणार्थी होती. या आरोपींमध्ये एक जण अल्पवयीन होता. राम सिंह नावाच्या आरोपीने तुरुंगात आत्महत्या केली. अल्पवयीन आरोपी बलात्कार आणि हत्या प्रकरणात दोषी ठरला. त्याला जास्तीत जास्त तीन वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा (तीदेखील सुधारगृहात राहून भोगायची) दिली गेली. नंतर त्याची सुटकाही झाली. उर्वरित चार जण दोषी ठरल्यामुळे त्यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली गेली.

फेरविचार याचिका

अक्षय कुमार सिंह याने या खटल्यातील चारही दोषींना मृत्युदंडाच्या सुनावण्यात आलेल्या शिक्षेचा फेरविचार करावा, अशी याचिका मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात केली.याच खटल्यातील इतर तीन दोषींनी शिक्षेचा फेरविचार करावा या केलेल्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने ९ जुलै, २०१८ रोजी फेटाळून लावल्या होत्या.

अक्षय सिंह याने त्या तिघांसोबत फेरविचार याचिका केली नव्हती, असे त्याचे वकील ए. पी. सिंह यांनी सांगितले. शिक्षेचा फेरविचार करावा, अशी कोणतीच परिस्थिती त्यांना निर्माण करता आलेली नाही, असे सांगून न्यायालयाने त्यांच्या याचिका फेटाळल्या होत्या.च्या दोषींना दिल्ली उच्च न्यायालय आणि ट्रायल कोर्टने सुनावलेली मृत्युदंडाची शिक्षा २०१७ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवली होती. 

 

 

टॅग्स :Nirbhaya Gang-rapeनिर्भया गॅंगरेपSupreme Courtसर्वोच्च न्यायालय