शहरं
Join us  
Trending Stories
1
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
2
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
3
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
4
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
5
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
6
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
7
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
8
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
9
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
10
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
11
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
12
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
13
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
14
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
15
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
16
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
17
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
18
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
19
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
20
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका

‘निर्भया’च्या खुन्यांना आता ३ मार्च रोजी होणार फाशी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2020 6:09 AM

न्यायालयाने काढले चौघांचे ‘डेथ वॉरन्ट’

नवी दिल्ली : ‘निर्भया’ बलात्कार व खून खटल्यात मृत्युदंडाची शिक्षा झालेल्या चारही खुन्यांना फाशी देण्यासाठी येथील सत्र न्यायालयाने सोमवारी ३ मार्च ही नवी तारीख निश्चित केली. त्यानुसार मुकेश कुमार सिंग, पवन गुप्ता, विनय कुमार शर्मा व अक्षय कुमार यांना ३ मार्च रोजी सकाळी ६ वाजता दिल्लीच्या तिहार कारागृहात फासावर लटकविले जाईल.

याआधी २२ जानेवारी व १ फेब्बुवारी या तारखा ठरल्या होत्या. परंतु कायदेशीर गुंत्यामुळे तेव्हा फाशी दिली गेली नव्हती. फाशीची नवी तारीख ठरविण्यासाठी ‘निर्भया’च्या पालकांनी व दिल्ली प्रशासनाने अर्ज केले होते. ते मंजूर करून अतिरिक्त सत्र न्यायाधीश धमेंद्र राणा यांनी चौघांविरुद्ध नव्याने ‘डेथ वॉरन्ट’ जारी केली. याआधीच्या सुनावणीत खुनी विनयच्या वकिलाने आरोप केला की, विनयवर तुरुंगात हल्ला करण्यात आला. त्यात त्याच्या डोक्याला इजा झाली. शिवाय त्याचे मानसिक संतुलन ठीक नसताना त्याला फाशी दिली जाऊ शकत नाही. याखेरीज पवनला सर्वोच्च न्यायालयात ‘क्युरेटिव याचिका’व राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज करायचा आहे, तर अक्षय कुमारला राष्ट्रपतींकडे पुन्हा दयेचा अर्ज करायचा आहे, त्यामुळे हे होईपर्यंत फशी देऊ नये, असे या दोघांच्या वकिलांचे म्हणणे होते.समाधान व निषेधया निकालावर निर्भयाच्या आईने काहीशा नाखुशीने समाधान व्यक्त केले, तर खुन्यांच्या कुटुंबीयांनी निषेध केला. आत्तापर्यंत आम्ही खूप सोसले. अखेरीस नवी ‘डेथ वॉरन्ट’ निघाली, यात समाधान आहे. आता तरी ठरल्यावेळी फाशी दिली जाईल, अशी आशा आहे, असे निर्भयाची आई म्हणाली.

टॅग्स :Nirbhaya Gang-rapeनिर्भया गॅंगरेपCourtन्यायालय