निर्भया माहितीपटाचा अमेरिकेत प्रिमियर...
By Admin | Updated: March 8, 2015 01:25 IST2015-03-08T01:25:39+5:302015-03-08T01:25:39+5:30
‘इंडियाज डॉटर’ हा वादग्रस्त माहितीपट ९ मार्च रोजी अमेरिकेत आॅस्कर पुरस्काराच्या मानकरी अभिनेत्री मेरील स्ट्रीप आणि फ्रीडा पिन्टो यांच्या उपस्थित प्रदर्शित करण्यात येणार आहे.

निर्भया माहितीपटाचा अमेरिकेत प्रिमियर...
९ मार्च रोजी होणार प्रदर्शित : हॉलीवूड अभिनेत्री मेरील स्ट्रीप, फ्रीडा पिन्टोची उपस्थिती
न्यूयॉर्क : अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा कैवार घेत एका स्वयंसेवी संस्थेच्या पुढाकाराने ‘निर्भया’ घटनेवरील ‘इंडियाज डॉटर’ हा वादग्रस्त माहितीपट ९ मार्च रोजी अमेरिकेत आॅस्कर पुरस्काराच्या मानकरी अभिनेत्री मेरील स्ट्रीप आणि फ्रीडा पिन्टो यांच्या उपस्थित प्रदर्शित करण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने स्वीत्झर्लंड, नॉर्वे आणि कॅनडासह जगभरात हा माहितीपट प्रदर्शित केला जाणार आहे.
‘बीबीसी’ने भारताच्या विनंतीची कदर न करता हा वादग्रस्त माहितीपट बुधवारी ब्रिटनमध्ये प्रसारित केल्यापासून अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे पाठीराखे आणि विरोधक एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. भारतात या माहितीपटावर बंदी घालण्यात आली आहे. बारूच कॉलेज आॅफ द सिटी युनिव्हर्सिटी आॅफ न्यूयॉर्क येथे हा माहितीपट प्रदर्शित केला जाणार असून व्हायटल व्हॉईसेस ग्लोबल पार्टनरशिप अॅण्ड चिल्ड्रेन्स डेव्हलपमेन्ट आॅर्गनायजेशन प्लान इंटरनॅशनल या स्वयंसेवी संघटनेच्या वतीने या माहितीपटाचा प्रिमियर आयोजित करण्यात आला आहे. यावेळी या माहितीपटाच्या दिग्दर्शिका लेस्ली उडवीन यांचीही उपस्थिती राहणार आहे.
‘बिकॉज आय एम अ गर्ल’ हे अभियान या स्वयंसेवी संस्थेच्या वतीने राबविण्यात येत असून अभिनेत्री मेरील स्ट्रीप आणि पिन्टो या अभियानाच्या ग्लोबल अॅम्बेसेडर आहेत. (वृत्तसंस्था)
वाईटाचा पर्दाफाश
च्सर्व जगाने या समजदार आणि साहसपूर्ण आवाहनावर विचार केला पाहिजे. भारतापुरतेच नव्हे तर ही बाब प्रत्येक ठिकाणी अनुभवावयास येते.
च्अशा भयावह गुन्ह्याला बळ देणाऱ्या प्रवृत्तीचा पर्दाफाश करण्याचे धाडस प्रत्येकाने दाखवायला हवे, असे मत व्हायटल व्हॉईसेस ग्लोबलच्या मानवी हक्क समितीच्या उपाध्यक्ष सिंडी डायर यांनी व्यक्त केले आहे.