निर्भया प्रकरण ; वकिलांना नोटीस
By Admin | Updated: March 8, 2015 01:23 IST2015-03-08T01:23:34+5:302015-03-08T01:23:34+5:30
महिलांबद्दल अपमानजनक वक्तव्य करणाऱ्या दोन वकिलांना बार कौन्सिल आॅफ इंडियाने (बीसीआय) कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
निर्भया प्रकरण ; वकिलांना नोटीस
नवी दिल्ली : दिल्लीतील १६ डिसेंबरच्या निर्भया सामूहिक बलात्कार व हत्याकांड प्रकरणावरील वादग्रस्त माहितीपटात महिलांबद्दल अपमानजनक वक्तव्य करणाऱ्या दोन वकिलांना बार कौन्सिल आॅफ इंडियाने (बीसीआय) कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. कनिष्ठ न्यायालयात आरोपींच्या वतीने बाजू मांडणाऱ्या दोन वकिलांचे वक्तव्य आक्षेपार्ह आणि वकिली व्यवसायाच्या दृष्टीने गैरवर्तन असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
बीसीआयचे अध्यक्ष मननकुमार मिश्रा यांनी ही माहिती दिली. त्यांचे हे गैरवर्तन कुठल्या व्याख्येत बसते हे बघितल्यानंतर पुढील कारवाईबाबत निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. बीसीआय कार्यकारिणीच्या बैठकीनंतर शुक्रवारी रात्री हा निर्णय घेण्यात आला.