Nirbhaya Case : अखेर न्याय जिंकला! नराधमांना फाशी दिल्यानंतर मोदींनी दिली प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2020 12:59 PM2020-03-20T12:59:52+5:302020-03-20T13:03:59+5:30

Nirbhaya Case : महिलांची प्रतिष्ठा आणि सुरक्षेची काळजी घेण्याला प्राधान्य असायला हवे अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरद्वारे दिली आहे. 

Nirbhaya Case: Justice has prevailed! Modi's reaction after hanging Nirbhaya's convict pda | Nirbhaya Case : अखेर न्याय जिंकला! नराधमांना फाशी दिल्यानंतर मोदींनी दिली प्रतिक्रिया

Nirbhaya Case : अखेर न्याय जिंकला! नराधमांना फाशी दिल्यानंतर मोदींनी दिली प्रतिक्रिया

Next
ठळक मुद्देमध्यरात्री पार पडलेल्या सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाने फाशीच्या शिक्षेबाबत पुनर्विचार करण्यासाठी एका दोषीने दाखल केलेली याचिका शेवटच्या मिनिटाची फेटाळली.य जिंकला! महिलांचा सन्मान आणि सुरक्षितता अत्यंत महत्वाचे असून महिलांची प्रतिष्ठा आणि सुरक्षेची काळजी घेण्याला प्राधान्य असायला हवे अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.

नवी दिल्ली - २०१२ च्या निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणात दोषी ठरलेल्या चौघांना आज सकाळी फाशी देण्यात आली. मध्यरात्री पार पडलेल्या सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाने फाशीच्या शिक्षेबाबत पुनर्विचार करण्यासाठी एका दोषीने दाखल केलेली याचिका शेवटच्या मिनिटाची फेटाळली. निर्भयाच्या दोषींना फासावर चढवल्यानंतर राजकीय स्थरातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली. त्यानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निर्भयाच्या दोषींना फाशी दिल्यानंतर ट्विटरवरून प्रतिक्रिया दिली आहे. न्याय जिंकला! महिलांचा सन्मान आणि सुरक्षितता अत्यंत महत्वाचे असून महिलांची प्रतिष्ठा आणि सुरक्षेची काळजी घेण्याला प्राधान्य असायला हवे अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरद्वारे दिली आहे. 



आमच्या नारी शक्तीने प्रत्येक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. एकत्रितपणे, आम्हाला असे राष्ट्र निर्माण करावे लागेल जेथे महिला सशक्तीकरणावर लक्ष केंद्रित केले जाईल आणि महिलांची समानता आणि संधी यावर भर दिला जाईल, असे देखील मोदी यांनी आपल्या ट्विटमधून संबोधित केले आहे. 

Nirbhaya Case: 'त्या' चौघांना एकत्र फासावर लटकवून जल्लाद पवनने मोडला पणजोबांचा रेकॉर्ड

 

Nirbhaya Case: सॅल्यूट! संयमाची 'सीमा' ढळू न देता न्यायालयात लढली; देशाची वाहवा मिळवली

 

Nirbhaya Case: ‘माझ्या देशात महिलांना न्याय मिळतोच याचा मला अभिमान, पण...'

 

Nirbhaya Case : 'निर्भया'चे दोषी फासावर लटकल्यानंतर अरविंद केजरीवालांचा मोठा संकल्प

दोषी अक्षय कुमार सिंग, पवन गुप्ता, विनय शर्मा आणि मुकेश सिंह या चार दोषींना पहाटे साडेपाच वाजता दिल्लीच्या तिहार तुरूंगात फाशी देण्यात आली. डिसेंबर २०१२ मध्ये निर्भया नावाच्या 23 वर्षीय वैद्यकीय विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार आणि तिचा खून केल्याबद्दल चौघांना दोषी ठरविण्यात आले होते.

 

Web Title: Nirbhaya Case: Justice has prevailed! Modi's reaction after hanging Nirbhaya's convict pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.