शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीतून पंतप्रधान कोण होणार? जयराम रमेश म्हणाले- "सर्वात मोठ्या पक्षाचा उमेदवार..."
2
पुणे अपघात: 'या' ३ प्रश्नांची उत्तरे आता तुम्हीच द्या; अंबादास दानवेंनी केली अजित पवारांची कोंडी
3
"जास्त जागा जिंकूनही ही निवडणूक नसेल मोदींची बेस्ट इनिंग", प्रशांत किशोर यांनी सांगितलं कारण
4
सूर्य कोपला! राजस्थानमध्ये उष्णतेची लाट; जवानानं पापड भाजून दाखवला, नेटकरी गहिवरले
5
पॅनिक होऊ नका, विराटच्या जीवाला नाही धोका! सराव सत्र रद्द करण्यामागचा ग्राऊंड रिपोर्ट 
6
"त्यांना भाजपामध्ये यायचं होतं पण..."; कैलाश विजयवर्गीय यांचा कमलनाथांबाबत मोठा खुलासा
7
माधुरीच्या सौंदर्याकडे पाहतच राहिला अभिनेता, हातात असलेल्या सिगरेटचंही नव्हतं भान अन्...
8
महाराष्ट्रात निवडणूक संपताच महायुतीत आरोप प्रत्यारोप; एकमेकांवर करतायेत चिखलफेक
9
"फडणवीसांनी सांगितले तेच खरे, हा घ्या पुरावा; धंगेकरांवर मुरलीधर मोहोळांचा पलटवार
10
सांगलीचा सचिन बनला वर्ल्ड चॅम्पियन! शाळेत असताना डाव्या हाताला आले अपंगत्व, तरीही तो... 
11
"१० वर्ष माझ्या वडिलांनी केलेल्या कामाचा मला फायदा होईल"; अमोल कीर्तिकरांनी सगळंच सांगितलं
12
"विराट कोहलीवर जेव्हा मी बोली लावत होतो त्यावेळी मला वाटलं होतं की..."; विजय मल्ल्याचे स्पेशल ट्विट
13
"मोदींनी सैनिकांना मजूर बनवले, आता दोन प्रकारचे शहीद होणार," राहुल गांधींचे टीकास्त्र
14
Closing Bell Today: शेअर बाजारात तेजी; हिंदुस्तान झिंकनं ३० दिवसांत पैसे केले दुप्पट, भेल घसरला
15
Corona Virus : भारतात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा कहर; 324 जणांना संसर्ग, 'या' राज्यात सर्वाधिक रुग्ण
16
Indian Temple: भारतात आहे यमराजाचे दुर्मिळ मंदिर; पण तिथे जाण्यास लोक का घाबरतात? वाचा!
17
Amruta Fadnavis : "बाल न्याय मंडळाची लाज वाटते"; पुणे हिट अँड रन प्रकरणी अमृता फडणवीसांचा संताप
18
Buddha Purnima 2024: बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने जाणून घ्या भगवान बुद्धांनी दाखवलेला राजमार्ग!
19
ENG vs PAK: World Cup ची तयारी पण पाकिस्तानची डोकेदुखी वाढली; स्टार खेळाडू झाला बाहेर
20
Zerodha का करत नाही आपली जाहिरात? सीईओ Nithin Kamath यांनी केला खुलासा

Nirbhaya Case : ४ नाही, पाचही नराधम फासावर लटकले असते तर... अभिनेत्यानं व्यक्त केली खंत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2020 1:53 PM

निर्भया सामूहिक हत्या आणि बलात्कार प्रकरणी दोषी अक्षय कुमार सिंग, पवन गुप्ता, विनय शर्मा आणि मुकेश सिंह या चार दोषींना पहाटे साडेपाच वाजता दिल्लीच्या तिहार तुरूंगात फाशी देण्यात आली.

नवी दिल्ली - २०१२ च्या निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणात दोषी ठरलेल्या चौघांना आज सकाळी फाशी देण्यात आली. मध्यरात्री पार पडलेल्या सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाने फाशीच्या शिक्षेबाबत पुनर्विचार करण्यासाठी एका दोषीने दाखल केलेली याचिका शेवटच्या मिनिटाची फेटाळली. निर्भयाच्या दोषींना फासावर चढवल्यानंतर राजकीय स्थरातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली. तसेच, बॉलिवूडमधील कलाकारांनीही आपलं मत व्यक्त केलं आहे. या फाशीच्या शिक्षेचं सर्वांनीच स्वागत केलं आहे. अभिनेता मनोज जोशी यांनी न्याय व्यवस्थेचा हा विजय असल्याचे म्हटले. मात्र, ४ ऐवजी पाचही नराधमांना फाशी व्हायला हवी होती, असेही त्यांनी म्हटले. 

निर्भया सामूहिक हत्या आणि बलात्कार प्रकरणी दोषी अक्षय कुमार सिंग, पवन गुप्ता, विनय शर्मा आणि मुकेश सिंह या चार दोषींना पहाटे साडेपाच वाजता दिल्लीच्या तिहार तुरूंगात फाशी देण्यात आली. डिसेंबर २०१२ मध्ये निर्भया नावाच्या 23 वर्षीय वैद्यकीय विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार आणि तिचा खून केल्याबद्दल चौघांना दोषी ठरविण्यात आले होते. याप्रकरणात न्यायालयाने ६ दोषींना फाशीची शिक्षा सुनावली होती. त्यापैकी राम सिंहनामक एका आरोपीने तुरुंगातच फाशी घेऊन आत्महत्या केली. तर, सहाव्या आरोपीला न्यायालयाने अल्पवयीन असल्याने ३ वर्षांची शिक्षा सुनावली. त्यामुळे याप्रकरणातील सहावा आणि अल्पवयीन असलेला आरोपी सध्या मुक्तपणे जीवन जगत आहे. निर्भयावर बलात्कार करण्यात आला, त्यावेळी याचे वय १७ वर्षे ६  महिने होते. त्यामुळे १८ वर्षांपेक्षा कमी वय असल्याने जुवेनाईल कोर्टात या आरोपीचा खटला चालला. त्यानुसार, ३ वर्षे शिक्षा भोगल्यानंतर तो आरोपी तुरुंगातून बाहेर आला आहे. मात्र, लोकांमध्ये त्याबद्दल प्रचंड राग असल्याने तो सध्या दक्षिण भारतातील एका जिल्ह्यात वेटरचे काम करत आहे. तसेच, स्वत:ची खरी ओळख लपवून तो राहत आहे. निर्भयावर अमानुष अत्याचार करण्यात हाच सर्वात पुढे होता. त्यामुळेच, यालाही फासावर लटकावले असते तर बर... अशी भावना आज व्यक्त होत आहे. 

अभिनेता मनोज जोशी यांनी ट्विट करुन, अखेर न्यायव्यवस्थेचा विजय झाल्याचे म्हटले. तसेच, आशा देवी यांच्या संघर्षाला माझं नमन, आईपेक्षा मोठा कुठलाच योद्धा नाही, हे आशादेवी यांनी सिद्ध केलंय. देशातील इतर मुलींनाही असाच न्याय मिळेल. मात्र, ४ ऐवजी पाचही नराधमांना फाशी झाली असती तर बरं... असेही जोशी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय. दरम्यान, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निर्भयाच्या दोषींना फाशी दिल्यानंतर ट्विटरवरून प्रतिक्रिया दिली आहे. न्याय जिंकला! महिलांचा सन्मान आणि सुरक्षितता अत्यंत महत्वाचे असून महिलांची प्रतिष्ठा आणि सुरक्षेची काळजी घेण्याला प्राधान्य असायला हवे अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.  

टॅग्स :Nirbhaya Gang-rapeनिर्भया गॅंगरेपdelhiदिल्लीCourtन्यायालयManoj Joshiमनोज जोशी