शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

नीरव मोदी आला नाहीच; उलट त्याचे आठ साथीदार देशाबाहेर पळाले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2018 4:20 PM

नीरवचे आठ घोटाळेबाज सहकारी भारतीय पासपोर्टवर जगभर फिरत आहेत

नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करुन परदेशात पळालेला नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहुल चोक्सीला भारतात परत आणण्यासाठी भारतीय यंत्रणा प्रयत्न करत आहेत. मात्र गेल्या काही महिन्यांमध्ये नीरव मोदीचे आठ घोटाळेबाज साथीदारसुद्धा परदेशात पळून गेल्याचं समोर आलं आहे. अंमलबजावणी संचलनालयातील सूत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार, 13 हजार 700 हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील नीरव मोदीचे आठ साथीदार भारतीय पासपोर्टवर जगभर प्रवास करत आहेत. नीरवचे हे सहकारी ज्याप्रकारे अंमलबजावणी संचलनालयाची (ईडी) दिशाभूल करत आहेत, त्यावरुन त्यांना फरार म्हणता येईल, असं सूत्रांनी सांगितलं. मुंबईतील पासपोर्ट कार्यालयाला ईडीनं एक पत्र पाठवलं आहे. आठ भारतीय नागरिक नीरवच्या हाँगकाँग आणि दुबईतील कंपन्यांमध्ये समभागधारक आणि संचालक असल्याची माहिती या पत्रातून पासपोर्ट कार्यालयाला देण्यात आली आहे. भारतीय पासपोर्टवर जगभरात प्रवास करणाऱ्या नीरव मोदीच्या साथीदारांना समन्स बजावण्यात आल्याची माहिती प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी दिली. या व्यक्तींशी संपर्क साधण्याचा प्रयत्नही ईडीकडून केला जात आहे. मात्र नीरवचे साथीदार ईडीला वारंवार चकवा देत आहेत. या सर्व व्यक्तींची माहिती ईडीनं पासपोर्ट कार्यालयाला दिली आहे. पासपोर्ट कार्यालयाला या व्यक्तींची प्रवासासंबंधीची कागदपत्रं रद्द करता यावीत, यासाठी ईडीनं हे पाऊल उचललं आहे. देश सोडून पळून गेलेले नीरव मोदीचे आठ जवळचे साथीदार1. सोनू शैलेष मेहता, ओराजेम कंपनी लिमिटेड2. भाविक जयेश शाह, ब्रिलियंट डायमंड लिमिटेड3. आशिष बजरंगलाल बागरिया, इटर्नल डायमंड्स कॉर्पोरेशन4. नीलेश वालजीभाई खेतानी, फॅन्सी क्रिएशन्स कंपनी लिमिटेड5. आशिष कुमार मोहनभाई लाड, सनशाइन जेम्स लिमिटेड6. ज्योती संदीप मिस्त्री, डीजी ब्रदर्स एफजेडई7. जिग्नेश किरण कुमार शाह, पॅसिफिक डायमंड एफजेडई8. संदीप भारत मिस्त्री, वर्ल्ड डायमंड डिस्ट्रीब्यूशन एफजेडई 

टॅग्स :Nirav Modiनीरव मोदीEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयPunjab National Bank Scamपंजाब नॅशनल बँक घोटाळाPunjab National Bankपंजाब नॅशनल बँक