(निनाद) जवळेच्या सरपंचपदी रंगूबाई काळे
By Admin | Updated: August 23, 2015 20:40 IST2015-08-23T20:40:15+5:302015-08-23T20:40:15+5:30
निरगुडसर : जवळे ग्रामपंचायतीच्या सरपंच व

(निनाद) जवळेच्या सरपंचपदी रंगूबाई काळे
न रगुडसर : जवळे ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंचपदी दोन्ही महिलांची निवड झाल्यामुळे जवळे ग्रामपंचायतीत महिलाराज प्रस्थापित झाले आहे़ सरपंचपदी रंगूबाई काळे व उपसरपंचपदी सुवर्णा शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली़ सरपंच व उपसरपंचपदासाठी एकमेव अर्ज आल्याने दोन्ही पदांची निवड बिनविरोध झाल्याचे निवडणूक अधिकारी एस़ आऱ भोईर यांनी घोषित केले़ जवळे ग्रामपंचायतीच्या नऊ जागांसाठी अठरा उमेदवार रिंगणात होते़ त्यामध्ये वसंतराव खालकर यांच्या स्वयंभू महादेव पॅनलचे ६ उमेदवार निवडून आले होते़ बाबासाहेब खालकर यांच्या जय हनुमान पॅनलचे ३ उमेदवार निवडून आले होते़ परंतु सरपंचपद महिला राखीव अनुसूचित जमातीसाठी होते़ बहुमत मिळालेल्या पॅनलकडे असलेला अनुसूचित जमातीचा उमेदवार पराभूत झाल्यामुळे बाबासाहेब खालकर यांच्या जय हनुमान पॅनलच्या अनुसूचित जमातीच्या सदस्यास सरपंचपदाची संधी मिळाली़ नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच यांचा या वेळी सत्कार करण्यात आला़ निवडणूक अधिकारी म्हणून एस़ आऱ भोईर, तलाठी ए़ आऱ विभूते, ग्रामसेवक एम़ एम़ चिखले यांनी काम पाहिले़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़ छायाचित्र-सौ. रंगूबाई धोंडीभाऊ काळे - सरपंच व सौ. सुवर्णा पोपट शिंदे उपसरपंच०००००