लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 21:39 IST2025-11-11T21:26:10+5:302025-11-11T21:39:00+5:30
पश्चिम बंगालमधील बीरभूम येथे एका व्यक्तीने आपल्या पत्नीचे लग्न त्याच्या मित्राशी लावले. बापी आणि पंचमीचे लग्न नऊ वर्षांपूर्वी झाले होते, परंतु वादानंतर पंचमीने त्याचा मित्र जीतकुमारसोबत नातेसंबंध सुरू केले.

लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
लग्न म्हटले की वाद-विवाद आलेच. अनेकदा पती -पत्नीचा वाद झाल्याचे आपण पाहिले असेल. हा वाद काही वेळानंतर लगेच मिटतो, बंगालमध्ये एका पतीने आपल्या पत्नीचे लग्न मित्रासोबत लावून दिल्याची धक्कादायक प्रकरण समोर आले आहे.
बंगालमधील बीरभूम येथील एका तरुणाने नऊ वर्षांचे नाते तोडले आणि आपल्या पत्नीचे लग्न त्याच्या मित्राशी केले. पश्चिम बंगालमधील सैंथिया येथील नंदीकेशरी सतीपीठ मंदिरात हे लग्न झाले. नवविवाहित जोडप्यासमोर उभे राहून पतीने सांगितले की, "आजपासून मी मुक्त आहे. माझी पत्नी आता माझ्या मित्राची पत्नी आहे. आतापासून माझा मित्र तिचा सांभाळ करेल."
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
लग्न नऊ वर्षांपूर्वी झाले होते
बीरभूममधील सैंथिया येथील वॉर्ड क्रमांक ८ येथील रहिवासी बापी मंडल आणि बीरभूममधील तारापीठ येथील रहिवासी पंचमी मंडल यांचे लग्न सुमारे नऊ वर्षांपूर्वी झाले होते. त्यांना सात वर्षांचा मुलगा आहे. लग्नानंतर लगेचच त्यांच्यात भांडणे सुरू झाली. त्यानंतर पंचमीने तिच्या पतीविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली.
पत्नीचे तरुणाच्या मित्राशी प्रेमसंबंध
हे प्रकरण न्यायालयात गेले. तेव्हापासून पंचमी तिच्या वडिलांच्या घरी राहत आहे. तिचा मुलगा तिच्या पतीसोबत राहतो. दरम्यान, पंचमी तिच्या पतीचा मित्र जीतकुमार मिर्धा याच्याशी जवळीक साधू लागली. जीतचे घर सैंथियाच्या वॉर्ड क्रमांक १६ मध्ये आहे. त्यांचे प्रेमसंबंध समजल्यानंतर त्यांच्यात वाद वाढला.
दरम्यान, सोमवारी सकाळी बापी अचानक त्याची पत्नी आणि मित्रासह सैंथियातील नंदीकेशरी सतीपीठ मंदिरात पोहोचला आणि त्यांचे लग्न लावून दिले. लग्नानंतर पंचमीने तिच्या पतीविरुद्ध दाखल केलेला खटला मागे घेतला. बापीने सांगितले की, त्याच्या पत्नीने त्याच्या मित्राशी लग्न केल्यानंतर खटला मागे घेण्याचे आश्वासन दिले होते.