(निनाद) भीम वॉरियर्स कार्यकर्त्यांचा आरपीआयमध्ये प्रवेश

By Admin | Updated: September 1, 2015 21:38 IST2015-09-01T21:38:12+5:302015-09-01T21:38:12+5:30

दौंड : येथील भीम वॉरियर्स या संघटनेचे प्रमुख प्रमोद राणेरजपूत, श्रीकांत थोरात, सचिन परब, सोहन शिंदे, अतुल सिद्धगणेश, जितू सिदगणे यांच्यासह सुमारे दीडशे कार्यकर्त्यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियात (आठवले गट) प्रवेश घेतला.

(NINAD) Bhim Warriors activists enter the RPI | (निनाद) भीम वॉरियर्स कार्यकर्त्यांचा आरपीआयमध्ये प्रवेश

(निनाद) भीम वॉरियर्स कार्यकर्त्यांचा आरपीआयमध्ये प्रवेश

ंड : येथील भीम वॉरियर्स या संघटनेचे प्रमुख प्रमोद राणेरजपूत, श्रीकांत थोरात, सचिन परब, सोहन शिंदे, अतुल सिद्धगणेश, जितू सिदगणे यांच्यासह सुमारे दीडशे कार्यकर्त्यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियात (आठवले गट) प्रवेश घेतला.
या वेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा उपाध्यक्ष रवी कांबळे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे दौंड तालुका युवा आघाडीचे अध्यक्ष प्रकाश भालेराव यांनी उपस्थित कार्यकर्त्यांचा सत्कार केला. रवी कांबळे म्हणाले, की दिवसेंदिवस आरपीआयची ताकद वाढत चालली आहे. या पक्षात सर्व जातिधर्मातील लोकांना स्थान देण्याचे काम खासदार रामदास आठवले यांनी घेतले आहे. त्यांच्या या कार्याला बळकटी देण्याचे काम राज्यातील आरपीआयचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते करीत आहेत. भविष्यात सर्व जातिधर्मांतील लोकांना एकत्रित करून राजकीय, सामाजिक, शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येणार आहे. भीम वॉरियर्सच्या कार्यकर्त्यांनी आरपीआयमध्ये प्रवेश घेतल्यानंतर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी केली. त्यानंतर शहरातील सर्व राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्याला पुष्पहार समर्पित करण्यात आला.


फोटो ओळ : दौंड येथे भीमवॉरियर्स संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आरपीआयमध्ये प्रवेश घेतला. या वेळी त्यांचा सत्कार करताना रवी कांबळे, प्रकाश भालेराव व मान्यवर.

(जाहीरात आहे कृपया फोटोसह बातमी घेणे)

01092015-िं४ल्लि-05

----------------

Web Title: (NINAD) Bhim Warriors activists enter the RPI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.