(निनाद) भागवत धर्म जगात सर्वांत मोठा : जगताप

By Admin | Updated: February 14, 2015 23:52 IST2015-02-14T23:52:15+5:302015-02-14T23:52:15+5:30

सासवडला सोपानकाका भागवत संप्रदायाची स्थापना

(Ninaad) Bhagwat Dharma is the largest in the world: Jagtap | (निनाद) भागवत धर्म जगात सर्वांत मोठा : जगताप

(निनाद) भागवत धर्म जगात सर्वांत मोठा : जगताप

सवडला सोपानकाका भागवत संप्रदायाची स्थापना

सासवड : 'भागवत धर्म हा जगात सर्वांत मोठा धर्म आहे. सासवड येथील या ट्रस्टचे काम सर्वदूर पसरले पाहिजे, असे मत चंदूकाका जगताप यांनी व्यक्त केले.
सासवड येथे सोपानकाका भागवत संप्रदायाची स्थापना झाली, त्या वेळी आयोजित कार्यक्रमात जगताप बोलत होते. जगताप म्हणाले, 'भागवत संप्रदाय ट्रस्टने पंढरपूर येथे जागा खरेदी केली, ही चांगली गोष्ट आहे. आता त्या ठिकाणी बांधकाम सुरू करावे. त्यासाठी सर्वांनी हातभार लावावा.'
संत सोपानकाकांची संजीवन समाधी सासवड येथे आहे; परंतु त्याचा विकास फारसा झालेला नाही. सांप्रदायिक शिक्षण देण्याची सोय सासवड येथे होणे आवश्यक आहे. त्यासाठी आपण सर्वतोपरी मदत करू, असे हभप विजय अधिकारी यांनी सांगितले. ज्ञानेश्वर घाटे यांनी ट्रस्टच्या कामाचा आढावा घेतला.
ट्रस्टचे अध्यक्ष कृष्णाभाऊ देवकर यांनी श्रीक्षेत्र पंढरपूर येथे ६ गुंठे जमीन ट्रस्टच्या वतीने खरेदी केल्याची माहिती दिली. कार्याध्यक्ष अंकुश भगत, उपाध्यक्ष रमेश उबाळे, सुनील यादव, ज्ञानेश्वर थेउरकर, रामदास काळाणे, सर्जेराव काळे, सदाशिव चकणे यांनी मनोगत व्यक्त केले. सरचिटणीस ज्ञानेश्वर भोईटे यांनी अहवाल वाचन केले. या वेळी अण्णासाहेब राणे, नंदकुमार दिवसे, अंकुश भगत, सुधाकर गिरमे, गोकुळ कुंभारकर, शंकर म्हस्के हे उपस्थित होते.
०००

Web Title: (Ninaad) Bhagwat Dharma is the largest in the world: Jagtap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.