"रात्रीच्या वेळी मित्रांसोबत शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडायचा तलाल...", 'तेव्हा' निमिषाप्रियानं केले होते गंभीर आरोप!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 19:16 IST2025-07-10T19:15:37+5:302025-07-10T19:16:48+5:30

जेव्हा तलालच्या हत्येसंदर्भात निमिषाला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे, तेव्हा तिने तुरुंगातूनच तलालची अनेक गुपिते उघड केली होती. 

nimisha priya indian nurse in yemen Talal used to force to have physical relations with friends at night, Nimisha Priya made serious allegations from jail | "रात्रीच्या वेळी मित्रांसोबत शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडायचा तलाल...", 'तेव्हा' निमिषाप्रियानं केले होते गंभीर आरोप!

"रात्रीच्या वेळी मित्रांसोबत शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडायचा तलाल...", 'तेव्हा' निमिषाप्रियानं केले होते गंभीर आरोप!

केरळमधील पलक्कड जिल्ह्यातील रहिवासी असलेली नर्स निमिषाप्रियाला १६ जुलै रोजी येमेनमध्ये फाशीची शिक्षा दिली जाण्याची शक्यता आहे. भारत सरकार तिचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहे. निमिषावर तिच्या बिझनेस पार्टनरची हत्या केल्याचा आरोप आहे. येमेनचा रहिवासी तलाल अब्दो महदी हा निमिषाचा बिझनेस पार्टनर होता. मात्र, नंतर त्याची वाईट नजर निमिषावर पडली. तो तिला प्रचंड त्रास देऊ लागला. तो रात्री त्याच्या मित्रांना घरी बोलावून निमिषाला त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडायचा. तो रुग्णालयातही सर्वांसमोरच निमिषाला छळायचा. तो तिच्यावर थुंकतही असे. जेव्हा तलालच्या हत्येसंदर्भात निमिषाला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे, तेव्हा तिने तुरुंगातूनच तलालची अनेक गुपिते उघड केली होती. 

'द न्यूज मिनिट' वेबसाइटशी बोलताना निमिषाने पूर्वी सांगितले होते की, तलालने सर्वांना ती त्याची पत्नी असल्याचे सांगायला सुरुवात केली होती. मात्र, निमिषाचे केरळमधील थॉमस नावाच्या व्यक्तीशी आधीच लग्न झाले होते आणि त्यांना एक मुलगीही होती. २०१५ मध्ये येमेनमध्ये गृहयुद्ध सुरू झाल्यानंतर तलाल बदलू लागला आणि नंतर, दोघांमध्ये वारंवार वाद व्हायला सुरुवात झाली. निमिषा म्हणाली होती की, "क्लिनिक चांगल्या प्रकारे सुरू झाले होते. एका महिन्यातच चांगली कमाईही सुरू झाली होती. तलालने सुरुवातीला मला मदतही केली, जसे की, पैसे आणि वस्तू आणणे. मात्र, जेव्हा कमाई वाढली, तेव्हा तो दरमहा वाटा मागू लागला. नंतर त्याने क्लिनिकच्या शेअरहोल्डर्समध्येही त्याचे नाव जोडले."

'माला त्याच्या मित्रांसोबत संबंधांसाठी भाग पाडायचा' -
शिक्षेच्या सुनावणीनंतर, कारागृहातूनच बोलताना निमिषा म्हणाली होती, "तलालने मझा प्रचंड छळ सुरू केली होता.  तो मला मारहाण करायचा, क्लिनिकच्या कर्मचाऱ्यांसमोर माझ्यावर थुंकायचा. २०१६ मध्ये मी त्याच्याविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. यानंतर, त्याने माझा पासपोर्टही त्याच्याकडे घेतला आणि मला त्याच्यासोबत राहण्यास भाग पाडू लागला. तो दारू पिऊन घरी यायचा आणि मला मारहाण करायचा." 

निमिषा पुढे म्हणाली, "तो रात्री त्याच्या मित्रांनाही घरी आणायचा आणि मला त्यांच्यासोबत शोरीरिक संबंध प्रस्तापित करण्यास भाग पाडायचा. मी स्वतःला वाचवण्यासाठी बाहेर धावायची, त्याच्यापासून वाचण्यासाठी मी रात्री येमेनच्या रस्त्यांवर एकटीच धावत असायची. ही अशी जागा आहे जिथे रात्री रस्त्यावर कोणतीही महिला दिसत नाही." 

या सर्व त्रासानंतर, २०१७ मध्ये, आपला पासपोर्ट परत मिळवण्यासाठी, निमिषाने त्याला नशेचे औषध देऊन बेशुद्ध करण्याचा प्रयत्न केला. मात्र,  पहिल्यांदाच तो एवढा  नशेत होता की त्याच्यावर नशेच्या औषधाचा काहीही परिणाम झाला नाही. यानंतर, तलालचा पुन्हा ड्रग्जच्या ओव्हरडोसमुळे मृत्यू झाला. यानंतर, दुसऱ्यांदा नशेच्या औषधाचा ओव्हर डोस झाल्याने तलालचा मृत्यू झाला. यानंतर, पोलिसांनी निमिषाला अटक केली आणि नंतर तिला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.
 

Web Title: nimisha priya indian nurse in yemen Talal used to force to have physical relations with friends at night, Nimisha Priya made serious allegations from jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.