Maharashtra Politics: “निवडणूक आयोगाच्या निकालावर कोणतीही स्थगिती येणार नाही”; निहार ठाकरेंनी स्पष्ट केली भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2023 06:51 PM2023-02-22T18:51:01+5:302023-02-22T18:52:36+5:30

Maharashtra News: शिवसेना हा पक्ष मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली चांगल्या पद्धतीने चालतोय आणि यापुढे चालत राहील, असे निहार ठाकरेंनी नमूद केले.

nihar thackeray reaction over supreme court hearing on election commission of india decision on shiv sena dispute | Maharashtra Politics: “निवडणूक आयोगाच्या निकालावर कोणतीही स्थगिती येणार नाही”; निहार ठाकरेंनी स्पष्ट केली भूमिका

Maharashtra Politics: “निवडणूक आयोगाच्या निकालावर कोणतीही स्थगिती येणार नाही”; निहार ठाकरेंनी स्पष्ट केली भूमिका

googlenewsNext

Maharashtra Politics: केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण पक्षचिन्हाचा निर्णय शिंदे गटाच्या बाजून दिला. यानंतर ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात या निर्णयाला आव्हान दिले. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यानंतर उद्धव ठाकरे यांचे बंधू बिंदूमाधव ठाकरे यांचे सुपुत्र निहार ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या निकालावर कोणतीही स्थगिती येणार नाही, अशी खात्री वाटते, असा विश्वास व्यक्त केला. 

या याचिकेच्या सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाला नोटीस बजावली असली तरी आयोगाच्या निर्णयाला तूर्तास स्थगिती देण्यास नकार देत शिंदे गटाला दिलासा दिला. यानंतर आता प्रतिक्रिया येत आहेत. सर्वोच्च न्यायालयातील कायदेशीर प्रक्रियेत निहार ठाकरे हे शिंदे गटाच्या बाजूने आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर निहार ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आपली भूमिका स्पष्ट केली. 

निवडणूक आयोगाच्या निकालावर कोणतीही स्थगिती येणार नाही

सर्वोच्च न्यायालयात समोरच्या बाजूने याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर युक्तिवाद झाला. सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका दाखल करुन घेतली आहे. पुढच्या तारखेपर्यंत कोणत्याही बाजूच्या आमदार-खासदारांना अपात्र करता येणार नाही. आम्हाला दोन आठवडे उत्तर दाखल करण्यास दिले आहेत. पण आम्हाला खात्री आहे की, निवडणूक आयोगाच्या निकालावर कोणतीही स्थगिती येणार नाही, असे निहार ठाकरे यांनी म्हटले आहे. 

मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली चांगल्या पद्धतीने चालतोय

शिवसेना हा पक्ष मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली चांगल्या पद्धतीने चालतोय आणि यापुढे चालत राहील. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयाचे आम्ही स्वागत करतो निवडणूक आयोगाच्या निकालावर स्थगिती देण्याची कोणतीही आवश्यकता नव्हती, तशी स्थगिती दिलेली नाही. आता जेव्हा सुनावणी सुरु होईल, तेव्हा आम्ही निवडणूक आयोगाचा निर्णय कसा योग्य होता, हे पटवून देवू, असा निर्धार निहार ठाकरे यांनी व्यक्त केला.

दरम्यान, आम्ही सर्वोच्च न्यायालयात तोंडी आश्वासन दिले आहे. बँक खाते, प्रॉपर्टी हे पक्षाचे होते. आता पक्ष एकनाथ शिंदे चालवत आहेत. ज्यांच्याकडे आता पक्षच उरला नाही, त्यांचा पक्षाच्या कोणत्याही वस्तूवर अधिकार उरला नाही. सर्वोच्च न्यायालयाने मात्र यावर कोणताही निर्णय दिलेला नाही. कारण हे मुद्दे निवडणूक आयोगासमोर मांडले गेले नव्हते, अशी माहिती निहार ठाकरे यांनी दिली.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: nihar thackeray reaction over supreme court hearing on election commission of india decision on shiv sena dispute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.