एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2025 00:53 IST2025-05-12T00:51:23+5:302025-05-12T00:53:06+5:30

NIA nabs key Khalistani Kashmir Singh: मोतिहारी शहर पोलिसांनी कुख्यात खलिस्तानी दहशतवादी काश्मीर सिंह ग्लावड्डी उर्फ ​​बलबीर सिंह याला अटक केली आहे , ज्याच्यावर १० लाख रुपयांचे बक्षीस होते.

NIA nabs key Khalistani kashmir singh operative involved in 2016 Nabha jail break escape | एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

एनआयएच्या मदतीने मोतिहारी पोलिसांना आज संध्याकाळी मोठे यश मिळाले आहे. मोतिहारी शहर पोलिसांनी कुख्यात खलिस्तानी दहशतवादी काश्मीर सिंह ग्लावड्डी उर्फ ​​बलबीर सिंह याला अटक केली आहे , ज्याच्यावर १० लाख रुपयांचे बक्षीस होते. त्याच्यावर २०२२ मध्ये मोहाली येथील पंजाब पोलिसांच्या गुप्तचर शाखेच्या मुख्यालयावर रॉकेट-प्रोपेल्ड ग्रेनेड हल्ला केल्याचा आरोप आहे.

काश्मीर सिंह ग्लावड्डी उर्फ ​​बलबीर सिंह हा मूळचा लुधियानाचा रहिवासी आहे. त्याच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम १२०-ब, १२१, १२१-अ आणि बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायदा, १९६७ च्या कलम १७, १८, १८-ब आणि ३८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. खलिस्तान लिबरेशन फ्रंट, बब्बर खालसा इंटरनॅशनल आणि द इंटरनॅशनल शीख युथ फेडरेशनद्वारे देशाविरुद्ध युद्धाचा कट रचल्याचा त्याच्यावर आरोप आहे. अटकेनंतर त्याला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले. सध्या त्याची चौकशी सुरू आहे. एनआयए टीमच्या म्हणण्यानुसार, काश्मीर सिंग गलवाडी उर्फ ​​बलबीर सिंगला मोतिहारीहून दिल्लीला नेले जाईल.

मोतिहारीचे पोलीस अधीक्षक स्वर्ण प्रभात म्हणाले की, मोतिहारी शहर पोलीस आणि एनआयएने संयुक्तपणे केलेल्या छाप्यात १० लाख रुपयांचे बक्षीस असलेला खलिस्तानी दहशतवादी काश्मीर सिंह ग्लावड्डी  याला अटक करण्यात आली आहे. पाकिस्तानी आणि खलिस्तानी दहशतवादी हे भारतासाठी डोकेदुखी आहेत. यामुळे देशाच्या अंतर्गत सुरक्षेला आणि अखंडतेला नेहमीच धोका असतो. या देशातील लोक भारताविरुद्ध कट रचण्यात गुंतलेले आहेत, त्यामुळे एनआयएचे पथकही त्यांच्याविरुद्ध सातत्याने कारवाई करत आहे.

Web Title: NIA nabs key Khalistani kashmir singh operative involved in 2016 Nabha jail break escape

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.