शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

NIA-ED Raid on PFI: केंद्रातील मोदी सरकार लवकरच PFIवर बंदी घालणार; NIA च्या हाती मोठे पुरावे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2022 14:21 IST

Ban PFI: पीएफआयविरोधात NIA आणि ED च्या कारवाईत तपास संस्थांना हवाला ते दहशतवादाचे पुरावे मिळाले आहेत.

NIA-ED Raid on PFI: 22 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय तपास संस्था (NIA) आणि अंमलबजावणी संचालनालय (ED) ने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) च्या अनेक ठिकाणांवर छापे टाकले. यादरम्यान पीएफआयशी संबंधित 106 लोकांनाही अटक करण्यात आली. या छाप्यात अनेक खुलासे झाले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तपास यंत्रणांनी गोळा केलेल्या पुराव्यांच्या आधारे केंद्रीय गृह मंत्रालय पीएफआयवर बंदी घालण्याच्या तयारीत आहे.

PFI विरुद्ध भक्कम पुरावे सापडलेपीएफआयवर पीएफआयवर बंदी घातली आणि संस्थेने या बंदीला कोर्टात आव्हान दिले, तर कोर्टात सादर करण्यासाठी मजबुत पुरावे लागणार आहेत. त्यामुळेच पीएफआयवर बंदी घालण्यापूर्वी गृहमंत्रालयाच्या अधिकारी पूर्ण तयारी करत आहेत. दरम्यान, गुरुवारी देशातील 15 राज्यांमध्ये टाकण्यात आलेल्या छाप्यांमध्ये तपास यंत्रणांना पीएफआयविरोधात दहशतवादी कारवायांमध्ये सामील असल्याचे भक्कम पुरावे मिळाले आहेत. त्याआधारे लवकरच पीएफआयवर कारवाई होऊ शकते. 

कारवाईच्या सूचना दिल्याछापेमारीनंतर लगेचच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि एनआयए प्रमुख यांचीही बैठक घेतली. यामध्ये पीएफआयच्या विरोधात जमा झालेल्या पुराव्यांचा आढावा घेऊन पुढील कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गृह मंत्रालय पीएफआयवर बंदी घालण्याआधी कायदेशीर सल्लाही घेत आहे, जेणेकरून या प्रकरणी संबंधित पक्ष जेव्हा कोर्टात जाईल तेव्हा सरकारची तयारी पूर्ण होईल. 

NIA आणि EDचे छापेवेगवेगळ्या एजन्सी अनेक वर्षांपासून पीएफआयविरोधात सबळ पुरावे गोळा करण्यात गुंतल्या होत्या. पीएफआय संस्थेची कोणतीही लिंक सोडू नये, अशा सूचना गृह मंत्रालयाकडून देण्यात आल्या होत्या. एनआयएचा तपास गुन्हेगारी संघटनेच्या बेकायदेशीर कृतींवर केंद्रित असताना, ईडीला आता त्यांच्या आर्थिक स्रोताचा शोध घेण्यात पूर्णपणे यश आले आहे.

60 कोटींचा गैरव्यवहारईडीशी संबंधित एका सूत्राने सांगितले की, तपासादरम्यान पीएफआयच्या बँक खात्यांमध्ये सुमारे 60 कोटींचे संशयास्पद व्यवहार आढळून आले आहेत. हवालाद्वारेही पीएफआयला पैसे पाठवले जात असल्याचे माहिती मिळाली आहे. यासाठी आखाती देशांमध्ये काम करणाऱ्या मजुरांच्या बँक खात्यांचा वापर करून भारतात पैसे पाठवले जात होते. दुसरीकडे, एनआयएने 5 वेगवेगळ्या नोंदणीकृत प्रकरणांमध्ये भक्कम पुरावे गोळा केले आहेत, ज्यात स्फोटक बनवण्यापासून ते ISIS सारख्या संघटनेत तरुणांना पाठवण्यापर्यंतचे आरोप आहेत.

टॅग्स :NIAराष्ट्रीय तपास यंत्रणाEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयraidधाडHome Ministryगृह मंत्रालय