मनेष शेळके यांच्या बातम्या २
By Admin | Updated: February 14, 2015 23:51 IST2015-02-14T23:51:32+5:302015-02-14T23:51:32+5:30
घरफोड्याला पोलीस कोठडी

मनेष शेळके यांच्या बातम्या २
घ फोड्याला पोलीस कोठडीऔरंगाबाद : घरफोडी करून रोख रक्कम व मोबाईल लंपास करणार्या आरोपीला प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. व्ही. कस्तुरे यांनी १६ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. अप्पासाहेब जगताप काळे, रा.शिवराई असे आरोपीचे नाव आहे. चितेगाव येथील अप्पासाहेब भिकाजी कदम हे २८ जानेवारीला आपल्या कुटंुबियासह झोपलेले असताना चोरट्यांनी कडीकोंडा तोडून आत प्रवेश करून त्यांच्या खिशातील रोख अडीच हजार रुपये, मोबाईल असा ऐवज चोरून नेला होता. याप्रकरणी चितेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक सरोदे यांच्या पथकाने त्यास वाळूजवळ अटक केली. त्यास न्यायालयात हजर केले असता वरीलप्रमाणे पोलीस कोठडी सुनावली......घरफोड्याला अटकऔरंगाबाद : रशीदपुरा भागात घरफोडी करणार्या आरोपीला सिटीचौक पोलिसांनी अटक केली. संतोष ऊर्फ मुकेश गणेश रामफळे असे त्याचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून सोन्याची एकदाणी, दोन अंगठ्या जप्त करण्यात आल्या. शनिवारी त्यास न्यायालयात हजर केले असता, प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. व्ही. कस्तुरे यांनी त्यास १६ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.