शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

OMG...! जमिनीत पुरलेल्या अवस्थेत 48 तास जिवंत राहिली नवजात बालिका, चमत्कार पाहून डॉक्टरही थक्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2019 09:02 IST

देव तारी त्याला कोण मारी याचा प्रत्यय काही एका घटनेमुळे आला आहे.

बरेली (उत्तर प्रदेश) -  देव तारी त्याला कोण मारी याचा प्रत्यय काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशमधील  बरेली जिल्ह्यात आला. येथे स्मशानातील तीन फूट खोल खड्ड्यात हंड्यात पुरलेल्या अवस्थेत एक नवजात बालिका जिवंत सापडली होती. या मुलीची प्रकृती अद्याप गंभीर असून, तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, हंड्यात भरून जमिनीत पुरलेल्या अवस्थेत सुमारे 48 तास या मुलीने ज्या प्रकारे मृत्यूशी झुंज दिली ते पाहून तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे.  मृत्यूवर मात करणाऱ्या या मुलीवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले की, ही मुलगी जमिनीखाली पुरलेल्या अवस्थेत सुमारे 48 तास जिवंत राहिली. त्यामुळे तिच्या शरीरातील ब्राऊन फॅट कमी झाले आहे. ब्राऊन फॅट किंवा ब्राऊन एडिपोझ टिश्शू शरीरातील फॅटी अॅसिड आणि ग्लुकोज वापरून लहान बालकांना थंड वातावरणात जिवंत राहण्यास मदत करतात.''जमिनीत पुरलेल्या अवस्थेत सापडलेली बालिका ही गर्भावस्थेचा काळ पूर्ण होण्याआधीच जन्माला आलेली असून, तिचा प्लेटलेट्स काऊंट सरासरी 1.5 लाखांवरून घसरून केवळ 10 हजार इतका राहिला आहे. मात्र असे असले तरी ही बालिका जिवंत राहण्याचे संकेत मिळत आहेत.  फॅट कमी झाल्याने कमी झालेले या बालिकेच्या शरीराचे तापमान सामान्य पातळीवर आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. दरम्यान, ही नवजात बालिका उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहे. तिच्या प्रकृतीत सुधारणेचे संकेत मिळत आहेत. दरम्यान या बालिकेला आम्ही ट्युबच्या माध्यमातून अन्नपुरवठा करत  आहोत, अशी माहिती तिच्यावर उपचार करत असलेल्या डॉक्टरांनी दिली.   दरम्यान, भाजपा आमदार राजेश मिश्रा यांनी या मुलीच्या उपचारांचा आणि शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. जमिनीखाली सापडल्याने लोकांनी या मुलीचे सीता असे नामकरण केले आहे. दुसरीकडे या बालिकेला क्रूरपणे जमिनीत पुरून जाणाऱ्या माता-पित्याचा शोध पोलीस घेत आहेत. गेल्या गुरुवारीत बरेशी शहरातील एक कुटुंब आपल्या घरातील मृत बालिकेचा अंत्यविधी करण्यासाठी तिला स्मशानात घेऊन गेले असताना स्मशानातील खड्ड्यात ही बालिका हंड्यात पुरलेल्या अवस्थेत सापडली होती. त्यानंतर या कुटुंबाने या मुलीचा स्वीकार करत तिला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले होते.  

मृत मुलीला दफन करण्यासाठी गेलेल्या पित्याला स्मशानातील खड्ड्यात सापडले अनमोल रत्न...  

 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेUttar Pradeshउत्तर प्रदेशIndiaभारत