शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

निलंबित राज्यसभा खासदारांच्या आंदोलनाला नवे वळण, आता उपसभापतींनीच सुरू केले उपोषण

By बाळकृष्ण परब | Published: September 22, 2020 10:17 AM

कालची संपूर्ण रात्र संसद भवनाच्या आवारात आंदोलन करणाऱ्या आठ निलंबित खासदारांची भेट घेण्यासाठी राज्यसभेचे उपसभापती हरिवंश नारायण सिंह हे चहापाणी घेऊन आज सकाळीच आंदोलनस्थळी दाखल झाले आहे.

ठळक मुद्देराज्यसभेतून निलंबित करण्यात आलेले आठ खासदार संसद भवनाच्या आवारात महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर करत आहेत आंदोलन या आंदोलनकर्त्या खासदारांना चहापाणी देत स्वत: उपसभापती हरिवंश यांनी सुरू केले उपोषण हरिवंश याांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहून आपण एका दिवसाचे उपोषण करणार असल्याचे सांगितले

नवी दिल्ली - संसदेच्या पावसाळी अधिवेशनात केंद्र सरकारने मंजूर करवून घेतलेल्या कृषीविषयक विधेयकांवरून सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आलेले आहेत. या विधेयकाला विरोध करताना राज्यसभेमध्ये गोंधळ घालणाऱ्या आठ खासदारांना सभापतींनी काल निलंबित केले होते. आता हे निलंबित खासदार संसद भवनाच्या आवारात असलेल्या महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर आंदोलन करत आहेत. दरम्यान, आज सकाली या आंदोलनाला अजून एक वळण मिळाले आहे.कालची संपूर्ण रात्र संसद भवनाच्या आवारात आंदोलन करणाऱ्या या खासदारांची भेट घेण्यासाठी राज्यसभेचे उपसभापती हरिवंश नारायण सिंह हे चहापाणी घेऊन आज सकाळीच आंदोलनस्थळी दाखल झाले आहे. हरिवंश यांनी आंदोलनकर्त्या खासदारांना चहा पाजून स्वत: उपोषणास सुरुवात केली आहे. दरम्यान, उपसभापती हरिवंश याांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहून आपण एका दिवसाचे उपोषण करणार असल्याचे सांगितले आहे.

रविवारी राज्यसभेमध्ये कृषिसंबंधीची विधेयके मांडण्यात आली होती. त्यावेळी उपसभापती हरिवंश कामकाज पाहत होते. त्यादरम्यान, विरोधकांनी जोरदार गोंधळ घातला होता. तसेच राज्यसभेतील नियम पुस्तिकाही गोंधळी खासदारांनी फाडली होती. तसेच उपसभापतींच्या समोर असलेला माइकही या गदारोळात तुटला होता. त्यानंतर राज्यसभेच्या कामकाजाचे थेट प्रसारण थांबवण्यात आले होते. तसेच आवाजी मतदानाने ही विधेयके संमत करण्यात आली होती.राज्यसभेत गोंधळ घालणाऱ्या आठ खासदारांचे निलंबनकृषिविषयक विधेयके मांडल्यानंतर राज्यसभेत गोंधळ घालणाऱ्या आठ खासदारांना निलंबन करण्यात आले आहे. राज्यसभेत कृषी विधेयके रविवारी मांडली जात असताना निर्माण करण्यात आलेल्या गोंधळामुळे उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती एम. व्यंकय्या नायडू यांनी ही खासदारांवर निलंबनाची कारवाई केली. गोंधळ घालणाऱ्या विरोधी पक्षांतील आठ खासदारांना संसदेच्या उर्वरित अधिवेशनापर्यंत निलंबित केले आहे. यामध्ये खासदार डेरेक ओह्ण ब्रिएन, संजय सिंह, रिपुन बोरा, नजीर हुसैन, केके रागेश, ए करीम, राजीव सातव आणि डोला सेन यांचा समावेश आहे.१२ विरोधी पक्षांचा उपसभापतींवर अविश्वास प्रस्तावराज्यसभेत रविवारी झालेल्या कामकाजावर प्रचंड संतप्त झालेल्या १२ विरोधी पक्षांनी उपसभापती हरिवंश यांच्यावर अविश्वास प्रस्ताव दाखल केला. वरिष्ठ सभागृहात ज्या पद्धतीने रविवारी २ कृषी विधेयके मंजूर करण्यात आली, त्यावर विरोधकांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. ज्या पक्षांनी हा प्रस्ताव दाखल केला आहे, त्यात काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, समाजवादी पार्टी, तेलंगणा राष्ट्रीय समिती, माकपा, भाकपा, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल, नॅशनल कॉन्फरन्स, द्रमुक व आम आदमी पार्टी यांचा समावेश आहे. आजच्या प्रकाराने लोकशाहीचा खून झाला आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते अहमद पटेल यांनी दिली. उपसभापतींनी लोकसभेची सर्व मूल्ये पायदळी तुडवली आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

ही पथ्यं पाळा आणि तंदुरुस्त व्हा, कोरोनामुक्त रुग्णांना आरोग्य मंत्रालयाने दिले १० खास सल्ले

शेतकऱ्यांसाठी सरकारने आणली भरघोस नफा मिळवून देणारी योजना, मिळेल ८० टक्क्यांपर्यंत सब्सिडी

पँगाँगमध्ये चिनी सैन्याला सळो की पळे करणाऱ्या स्पेशल फ्रंटियर फोर्सची ही आहे खास वैशिष्टे 

म्हणून पँगाँगमध्ये ब्लॅक टॉप आहे सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा, तेथील भारताच्या वर्चस्वामुळे चीनचा होतोय तीळपापड 

टॅग्स :ParliamentसंसदRajya Sabhaराज्यसभाHarivansh Narayan Singhहरिवंश नारायण सिंहcongressकाँग्रेसAAPआप