देशातील वाहनचालकांना आणि प्रवाशांना मोठी दिलासा देणारी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी लोकसभेत केली. गडकरी यांनी सांगितले की, देशातील सध्याची टोल वसुली प्रणाली एका वर्षाच्या आत पूर्णपणे बंद केली जाईल आणि त्याऐवजी नवी इलेक्ट्रॉनिक टोल प्रणाली लागू केली जाईल. या नवीन प्रणालीमुळे महामार्गावर वाहने न थांबता, विनाअडथळा प्रवास करणे शक्य होईल.
नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले की, हायवे पूर्णपणे डिजिटल करण्याच्या उद्देशाने वाहन थांबवून शुल्क घेण्याची सध्याची पद्धत बंद करण्यात येत आहे. या नवीन तंत्रज्ञानामुळे देशभरातील टोल प्लाझा अदृश्य होतील आणि वाहने टोल भरण्यासाठी न थांबता वेगात पुढे जाऊ शकतील. यामुळे टोलवरील लांब रांगा आणि वेळेची बचत होईल.
कशा प्रकारे काम करेल ही नवीन प्रणाली?सध्याच्या FASTag तंत्रज्ञानावर आधारित ही नवी प्रणाली राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन (NETC) अंतर्गत नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने विकसित केली आहे. यात आरएफआयडी आधारित फास्टॅग उपकरण वाहनाच्या विंडस्क्रीनवर (समोरच्या काचेवर) लावले जाते. वाहन टोल प्लाझातून जाताना, हे उपकरण थेट चालकाच्या बँक खात्यातून टोलची रक्कम आपोआप कापते. यामुळे रोख व्यवहार किंवा थांबण्याची आवश्यकता भासत नाही.
सध्या ही नवीन प्रणाली देशभरातील सुमारे १० ठिकाणी चाचणी आणि देखरेखीसाठी लागू करण्यात आली आहे. पुढील एका वर्षात ती संपूर्ण राष्ट्रीय महामार्ग नेटवर्कवर लागू होण्याची अपेक्षा आहे.
Web Summary : Nitin Gadkari announced a new electronic toll system, replacing the current method within a year. This digital system eliminates toll plazas, allowing vehicles to pass without stopping, saving time and reducing queues. Trials underway at 10 locations.
Web Summary : नितिन गडकरी ने नई इलेक्ट्रॉनिक टोल प्रणाली की घोषणा की, जो एक साल में मौजूदा प्रणाली की जगह लेगी। यह डिजिटल सिस्टम टोल प्लाजा को खत्म कर देगा, जिससे वाहन बिना रुके गुजर सकेंगे, समय बचेगा और कतारें कम होंगी। 10 स्थानों पर परीक्षण चल रहा है।