वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 07:13 IST2026-04-09T07:13:00+5:302026-04-09T07:13:49+5:30

नव्या वेळापत्रकाची अंमलबजावणी केली तर दैनंदिन विमान सेवांसाठी वैमानिकांची संख्या आणखी कमी होणार आहे. 

New schedule of pilots postponed; DGCA's decision due to manpower shortage | वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय

वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: इराण-अमेरिका संघर्षामुळे युरोप आणि अमेरिकेला जाणाऱ्या विमानांना लांबचा पल्ला पडत असल्यामुळे वैमानिकांवर येणारा ताण लक्षात घेता नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) नव्या वेळापत्रकाच्या अंमलबजावणीला ३० एप्रिलपर्यंत स्थगिती दिली आहे.

काही महिन्यांपासून देशांतर्गत मार्गांवर तसेच आंतरराष्ट्रीय मार्गांवरील विमान वाहतुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. त्या तुलनेत वैमानिक आणि केबिन कर्मचाऱ्यांची संख्या मात्र कमी आहे. त्यात नव्या वेळापत्रकाची अंमलबजावणी केली तर दैनंदिन विमान सेवांसाठी वैमानिकांची संख्या आणखी कमी होणार आहे. 

त्यातच गेल्या महिनाभरापासून युद्ध सुरू असल्याने युरोप आणि अमेरिकेसाठी भारतीय विमान कंपन्यांना लांबच्या हवाई मार्गावरून प्रवास करावा लागत आहे. अशा स्थितीत नव्या वेळापत्रकाची अंमलबजावणी करणे शक्य नसल्याचा पवित्रा विमान कंपन्यांनी घेतला आहे. अखेर, कंपन्यांची परिस्थिती लक्षात घेत डीजीसीएने या नव्या वेळापत्रकाला तात्पुरती स्थगिती दिली आहे.

Web Title : कर्मचारी कमी होने के कारण पायलटों का नया शेड्यूल स्थगित: डीजीसीए का फैसला

Web Summary : ईरान-अमेरिका संघर्ष के कारण यूरोप और अमेरिका के लिए लंबे मार्गों और कर्मचारियों की कमी के कारण डीजीसीए ने पायलटों के नए शेड्यूल को 30 अप्रैल तक स्थगित कर दिया। एयरलाइंस ने तर्क दिया कि परिस्थितियों को देखते हुए नया शेड्यूल लागू करना असंभव था, जिसके कारण स्थगन हुआ।

Web Title : Pilot Schedule Postponed Due to Staff Shortage: DGCA Decision

Web Summary : DGCA delayed implementing the new pilot schedule until April 30th due to pilot strain from longer routes to Europe and America caused by the Iran-US conflict and existing staff shortages. Airlines argued implementing the new schedule was impossible given the circumstances, leading to the postponement.