शहरं
Join us  
Trending Stories
1
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
2
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार
3
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
6
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
7
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
8
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
9
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
10
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
11
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
12
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
13
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
14
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
15
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
16
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!

व्हॉट्सअ‍ॅपवरून पाच वेळाच फॉरवर्डची मिळणार मुभा, अफवा रोखण्यासाठी कंपनीने भारतात लागू केला नवीन नियम

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2018 4:48 AM

भारतात व्हॉट्सअ‍ॅपवरून आता कोणताही संदेश फक्त पाच जणांनाच फॉरवर्ड करता येईल.

नवी दिल्ली : भारतात व्हॉट्सअ‍ॅपवरून आता कोणताही संदेश फक्त पाच जणांनाच फॉरवर्ड करता येईल. त्याची अंमलबजावणी या आठवड्यापासून सुरु झाली आहे. अफवांचा प्रसार रोखण्यासाठी ठोस उपाययोजना न केल्याबद्दल केंद्र सरकारने कान उपटल्यानंतर व्हॉट्सअपने हे पाऊल उचलले आहे. देशातील २० कोटी लोक व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करतात. त्या सर्वांनाच या नव्या नियमाचा फटका बसणार आहे.या नव्या नियमाबद्दल व्हॉट्सअ‍ॅपने गेल्याच महिन्यात सुतोवाच केले होते. व्हॉट्सअ‍ॅप कसे वापरावे, अफवा व खोट्या माहितीचा प्रसार रोखण्यासाठी काय करता येईल याची माहिती देणारा एक नवीन व्हिडिओ या कंपनीने तयार केला. तो या आठवड्यात व्हॉट्सअ‍ॅप वापरणाऱ्यांना उपलब्ध होणार आहे.एखादा संदेश आपण दुसºयांना पाठवितो त्यावेळी काही दक्षता घेणे आवश्यक असते. मूळ संदेश कोणी लिहिला हे माहीत नसल्यास त्यात नेमके काय म्हटले आहे याची खातरजमा करुन घ्यावी. त्यातील माहिती खरी न वाटल्यास तो संदेश इतरांना पाठवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.>इतर देशांत एक संदेशवीस वेळा पुढे पाठविण्याची मुभाभारतामध्ये वापरकर्ते जेवढ्या प्रमाणात छायाचित्रे, संदेश, व्हिडिओ इतरांना पाठवितात तेवढा उत्साह अन्य देशांत आढळून येत नाही. भारताव्यतिरिक्त अन्य देशांत तेथील वापरकर्त्यांना एक संदेश दुसºयांना वीस वेळा पाठविण्याची मुभा व्हॉट्सअपने दिली आहे.राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण झाल्यास व्हॉट्सअप, फेसबुक, टेलिग्राम, इन्स्टाग्राम ही समाजमाध्यमे काही काळ बंद ठेवावीत, असे आदेश दूरसंचार खात्याने या दूरध्वनी कंपन्यांना दिल्याचे वृत्त होते. मात्र यासंदर्भात व्हॉट्सअपने म्हटले की, अफवा व खोट्या माहितीचा प्रसार रोखण्यासाठी मोबाइल अ‍ॅप्लिकेशन बंद करणे हा उपाय नाही. त्यापेक्षा वेगळ््या व प्रभावी उपाययोजना सरकारने कराव्यात.

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअॅपCentral Governmentकेंद्र सरकार