नाशिक सिक्युरिटी प्रेसचा नोट छपाईचा नवा विक्रम
By Admin | Updated: March 14, 2015 23:45 IST2015-03-14T23:45:26+5:302015-03-14T23:45:26+5:30
पुणे : चालू आर्थिक वर्षात तीनदा सर्वाधिक चलनी नोटा छापण्याचा विक्रम नाशिकच्या नॅशनल सिक्युरिटी प्रेसने केला असून, जानेवारीत ५४ कोटी ६ लक्ष २० हजार नोटा छापून नवा उच्चांक निर्माण केला आहे.

नाशिक सिक्युरिटी प्रेसचा नोट छपाईचा नवा विक्रम
प णे : चालू आर्थिक वर्षात तीनदा सर्वाधिक चलनी नोटा छापण्याचा विक्रम नाशिकच्या नॅशनल सिक्युरिटी प्रेसने केला असून, जानेवारीत ५४ कोटी ६ लक्ष २० हजार नोटा छापून नवा उच्चांक निर्माण केला आहे.सन २०१३च्या ऑगस्ट महिन्यात ५१३. ९३ दशलक्ष चलनी नोटांची निर्मिती झाली होती. २०१४- १५ या आर्थिक वर्षात तीन वेळा मोठ्या संख्येने नोटा तयार करून या छापखान्याने आपला हा जुना उच्चांक मागे टाकला. चालू आर्थिक वर्षातील जुलैमध्ये ५३१.१२ दशलक्ष, सप्टेंबरमध्ये ५३४ दशलक्ष, तर जानेवारीत ५४०.६२ दशलक्ष नोटा छापण्यात आल्या.