नवे मंत्री आणि ‘एनडीए’त नवे मित्र येणार; केंद्रात मंत्रिपदाच्या धोरणात बदल होणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2023 05:57 IST2023-06-06T05:55:42+5:302023-06-06T05:57:00+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावर जाण्याआधी किंवा संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होण्याआधी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता आहे.

नवे मंत्री आणि ‘एनडीए’त नवे मित्र येणार; केंद्रात मंत्रिपदाच्या धोरणात बदल होणार?
हरिश गुप्ता, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी या महिन्यात अमेरिका दौऱ्यावर जाण्याआधी किंवा संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होण्याआधी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता आहे. भाजप प्रणित एनडीएमध्ये नवे घटक पक्ष सामील होण्याचीही चर्चा आहे.
प्रत्येक केंद्रीय मंत्र्यांच्या कामगिरीचा पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या आढावा घेत आहेत. सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल ३० जूनपर्यंत विविध कार्यक्रम आहेत. त्यामुळे विस्तार जुलैमध्ये होण्याची शक्यता आहे. सध्या मंत्रिमंडळात सध्या ७६ मंत्री असून त्यात २९ कॅबिनेट मंत्री, ४५ राज्यमंत्री आहेत दोन राज्यमंत्र्यांकडे स्वतंत्र कार्यभार आहे. सध्याच्या मंत्रिमंडळातील दोन-तीन मंत्री व काही राज्यमंत्र्यांना दूर केले जाण्याची शक्यता आहे. लोकसभेच्या एकूण संख्याबळाच्या तुलनेत मंत्रिमंडळातील सदस्यांची संख्या १५ टक्के असू शकतात.
मंत्रिपदाच्या धोरणात बदल होणार?
भाजप तेलुगु देसम पक्ष, अण्णाद्रमुक, शिंदे गट यांच्याशी चर्चा करत आहे. लोकसभेतील सदस्यसंख्या विचारात न घेता पक्षांना प्रत्येकी एक मंत्रीपद द्यावे असे मोदी यांचे धोरण आहे. मात्र यात या धोरणातही बदल होण्याची शक्यता आहे. अकाली दल (बादल गट), चिराग पासवान यांचा लोक जनशक्ती पक्षालाही मंत्रिपद द्यावे लागणार आहे.