शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

...तर १ नोव्हेंबरपासून तुम्हाला सिलेंडर मिळणार नाही; जाणून घ्या नवे नियम

By कुणाल गवाणकर | Published: October 16, 2020 8:17 AM

LPG Cylinder Home Delivery DAC System: १ नोव्हेंबरपासून १०० शहरांमध्ये डॅक लागू होणार; जयपूरमधी पायलट प्रोजेक्टला यश

मुंबई: घरगुती वापरासाठी आवश्यक असलेल्या एलपीजी सिलेंडरच्या होम डिलिव्हरीचे नियम बदलणार आहेत. पुढील महिन्यापासून होम डिलिव्हरीच्या नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत. सिलेंडरची चोरी रोखण्यासाठी आणि योग्य ग्राहकाची ओळख पटवण्यासाठी कंपन्या डिलिव्हरी सिस्टिम लागू करणार आहेत. ही सिस्टिम नेमकी कशी असेल, जाणून घ्या..- या नव्या सिस्टिमला DAC असं नाव देण्यात आलं आहे. त्याचा अर्थ डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड असा होता. त्यामुळे आता केवळ बुकिंग करून सिलिंडरची घरापर्यंत डिलिव्हरी केली जाणार नाही. तर त्यासोबत तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक कोड पाठवण्यात येईल. तुम्ही डिलिव्हरी बॉयला जोपर्यंत हा कोड दाखवत नाही, तोपर्यंत सिलेंडर तुम्हाला मिळणार नाही. - एखाद्या ग्राहकानं वितरकाकडे त्याचा मोबाईल नंबर अपडेट केला नसल्यास डिलिव्हरी बॉयकडे असलेल्या ऍपच्या मदतीनं रियल टाईम नंबर अपडेट करता येईल. त्यानंतर कोड जनरेट करता येईल.- नवी यंत्रणा लागू झाल्यावर चुकीचा पत्ता आणि मोबाईल नंबर दिलेल्या ग्राहकांच्या अडचणी वाढतील. त्यांच्या घरी होणारी सिलेंडरची डिलिव्हरी रोखली जाऊ शकते.- तेल कंपन्या सर्वप्रथम नवी यंत्रणा १०० स्मार्ट सिटीमध्ये लागू करणार आहेत. त्यानंतर हळूहळू इतर शहरांमध्ये ही यंत्रणा लागू होईल. जयपूरमध्ये प्रायोगिक तत्त्वावर ही यंत्रणा लागू करण्यात आली आहे.- प्रायोगिक तत्त्वावर लागू करण्यात आलेल्या यंत्रणेला ९५ टक्क्यांहून अधिक यश मिळालं आहे. ही योजना घरगुती वापरासाठीच्या सिलेंडरसाठी असेल. व्यवसायिक वापरासाठीच्या सिलेंडरसाठी ही योजना लागू होणार नाही. 

टॅग्स :Cylinderगॅस सिलेंडर