शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

चोरीचा नवा फॉर्म्युला, बुद्धिमान चोरानं अॅमेझॉनला लावला अशा प्रकारे लाखोंचा चुना

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2017 14:15 IST

21 वर्षांच्या एका उच्चविद्याविभूषित तरुणानं स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर ऑनलाइन शॉपिंग कंपनी अॅमेझॉनला लाखोंचा गंडा घातला आहे.

नवी दिल्ली- 21 वर्षांच्या एका उच्चविद्याविभूषित तरुणानं स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर ऑनलाइन शॉपिंग कंपनी अॅमेझॉनला लाखोंचा गंडा घातला आहे. शिवम चोपडा नावाच्या तरुणानं अॅमेझॉनवरून 166हून अधिक महाग मोबाईल खरेदी केले आणि मोबाईलचा बॉक्स रिकामी असल्याचं कारण देत अॅमेझॉनकडून रिफंडही घेतलं आहे.पोलिसांच्या माहितीनुसार, शिवम या तरुणानं यंदा एप्रिल ते मे या दोन महिन्यांदरम्यान जवळपास 50 लाख रुपये कमावले आहेत. ज्या वेळी अॅमेझॉनला या चोरीचा थांगपत्ता लागला, त्यावेळी कंपनीनं पोलिसांत तक्रार केली. शिवम या तरुणानं रोहिणी येथून हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स केला होता. तसेच तो नोकरीलासुद्धा होता. परंतु शिवम त्याच्या नोकरीवर संतुष्ट नव्हता. त्यामुळे त्याने नोकरी सोडली. याच वर्षी मार्च महिन्यात त्यांच्या डोक्यातून एक सुप्त कल्पना जन्माला आली व त्याने एक प्रयोग करून पाहिला. पहिल्यांदा त्यानं अॅमेझॉनवरून दोन फोनची ऑर्डर दिली. त्यानंतर रिफंडही घेतला. त्यानंतर त्यानं दोन महिन्यात अॅपल, सॅमसंग, वन प्लस सारखे अनेक महागडे मोबाईल ऑनलाइन ऑर्डर केले व त्यांचे रिफंडही घेतले. फोन मिळाल्यानंतर शिवम ते मोबाइल ओएलएक्स वेबसाइट, गफ्फार मार्केटमध्ये जाऊन विकत होता.पोलिसांच्या माहितीनुसार शिवमनं केलेले ऑर्डर 60 लाखांहून अधिकचे होते. तसेच त्यानं फसवणूक करण्यासाठी त्रिनगरमधील निवासी सचिन जैनकडून बनावट सिम कार्ड विकत घेतलं होतं. सचिननं शिवमला जवळपास 141 प्री अॅक्टिवेट सिम दिले आणि शिवमनं त्या सिम कार्डच्या माध्यमातून वेगवेगळ्या पत्त्यांवर मोबाइल फोनची ऑर्डर मागवली. सचिन प्रत्येक सिमकार्ड मागे 150 रुपये घेत होता. शिवम या मोबाइल नंबरचा वापर ऑर्डर देण्यासाठी करत असे. आरोपी बोगस सिम कार्डच्या माध्यमातून किमती फोनची ऑर्डर देत होता. आणि वस्तू आल्यानंतर बॉक्समध्ये मोबाइल नसल्याचं कारण देत रिफंडही घेत होता. वरिष्ठ पोलीस अधिकारी मिलिंद डुंबरे यांनी सांगितलं की, आरोपींची ओळख शिवम चौपडा आणि सचिन जैन अशी झाली आहे. गेल्या 17 ऑगस्टला अॅमेझॉन शॉपिंग कंपनीच्या एका अधिका-यानं केशवपुरम पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दिली होती. त्यावरून पोलिसांनी आरोपी शिवम चोपडा याच्या घरातून 19 मोबाइल फोन, 12 लाख रुपये रोख व 40 बँक पासबुक व चेकबुक जप्त केले आहेत. 

टॅग्स :Mobileमोबाइलtheftचोरी