शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

'पद्मावती'वर नवे संकट, सेन्सॉर बोर्डामुळे सिनेमाची रिलीजची डेट वाढणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2017 20:56 IST

संजय लीला भंसाळी यांच्या पद्मावती चित्रपटावरून वादळ उठलेले असताना सेन्सॉर बोर्डाने काही तांत्रिक कारणे देत हा चित्रपट निर्मात्यांकडे परत

मुंबई - संजय लीला भंसाळी यांच्या पद्मावती चित्रपटावरून वादळ उठलेले असताना सेन्सॉर बोर्डाने काही तांत्रिक कारणे देत हा चित्रपट निर्मात्यांकडे परत पाठवल्याचे वृत्त असून या चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, ही निव्वळ अफवा असून चित्रपट 1 डिसेंबर रोजीच प्रदर्शित होणार असल्याचे निर्मात्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.पद्मावती चित्रपट नव्याने सेन्सॉर बोर्डाकडे आल्यानंतर नियमांची मोजपट्टी लावून त्याचे पुनरावलोकन केले जाईल आणि त्यानंतरच त्याबाबत अंतिम निर्णय दिला जाईल, असे वृत्त सूत्रांच्या हवाल्याने एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे.

चित्तोडगड किल्ल्यात प्रवेशबंदीदरम्यान पद्मावती सिनेमाच्या विरोधात शुक्रवारी (17 नोव्हेंबर) चित्तोडगड किल्ला,  राजस्थान येथे नारेबाजी तसेच प्रवेशबंदी करण्यात आली.  सिनेमामध्ये ऐतिहासिक तथ्यामध्ये काही बदल करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे.  

भन्साळींचे शीर कापून आणा, पाच कोटी मिळवा; राजपूत नेत्याकडून घोषणाउत्तरप्रदेशच्या मेरठमधील एका राजपूत नेत्याने अशी घोषणा केली की, जो व्यक्ती पद्मावती चित्रपटाचे दिग्दर्शक संजय लीली भन्साळी यांचे शीर कापून आणेल, त्याला 5 कोटी रुपयांचे बक्षीस दिले जाईल.

नाक कापण्याची धमकी करणी सेनेचे सदस्य महिपाल सिंह मकरानाने एक व्हिडिओ जारी करून सांगितलं की, राजपूत कधीही महिलांवर हात उगारत नाही. पण गरज पडली तर आम्ही दीपिकासोबत ते करु. लक्ष्मणने शूर्पनखासोबत जे केलं होतं ते आम्ही तिच्यासोबत करू. 

पद्मावतीला कोणीही रोखू शकणार नाही - दीपिका पदुकोणचित्रपट प्रदर्शित होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. आम्ही फक्त सेन्सॉर बोर्डाला उत्तर देण्यास बांधिल आहोत, असे अभिनेत्री दीपिका पदुकोणने गेल्या काही दिवसांपूर्वी म्हटले होते. तसेच, हा चित्रपट ठरल्यानुसार 1 डिसेंबरला प्रदर्शित होईल, असा विश्वास सुद्धा तिने व्यक्त केला होता.

पद्मावतीला विविध संघटनांचा विरोध...पद्मावती या चित्रपटला सुरुवातीपासूनच विरोध होत आहे. जयपूरमध्ये या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान विरोध झाला होता, तर खुद्द भन्साळींना मारहाणही करण्यात आली होती. महाराणी पद्मावतीवर आधारित या चित्रपटाची कथा आहे. राणी पद्मावती तिच्या सौंदर्य, बुद्धी आणि साहसासाठी लोकप्रिय होती. राणी पद्मावती आणि राजामध्ये काही इन्टिमेट सीन्स आहेत, तसेच या चित्रपटातून चुकीचा इतिहास मांडला जात असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी विविध संघटनांनी केली आहे.

टॅग्स :Padmavatiपद्मावतीSanjay Leela bhansaliसंजय लीला भन्साली