प्रियकरासाठी 'ती' 2 मुलं, पतीला सोडून नेपाळहून भारतात आली पण सत्य समजताच हादरली
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2023 11:05 IST2023-08-21T10:56:43+5:302023-08-21T11:05:28+5:30
नेपाळमधील रहिवासी असलेल्या संगीता देवीने प्रियकर गोविंदसाठी आपल्या पहिल्या पतीला घटस्फोट दिला. त्यानंतर गोविंदशी लग्न केलं.

फोटो - आजतक
सीमा हैदरसारखीच एक घटना बिहारच्या दरभंगामध्येही पाहायला मिळाली आहे. नेपाळमधील रहिवासी असलेल्या संगीता देवीने प्रियकर गोविंदसाठी आपल्या पहिल्या पतीला घटस्फोट दिला. त्यानंतर गोविंदशी लग्न केलं. पण गोविंद आधीच विवाहित असून त्याला दोन मुलं आहेत हे तिला माहीत नव्हतं. गोविंद तिच्याकडे दुर्लक्ष करत होता. गोविंद असं का करत होता हे संगीताला कळत नव्हतं. तिने त्याच्या खऱ्या घराचा पत्ता मिळाला. त्यानंतर घरी पोहोचल्यावर तिला धक्का बसला कारण तिच्याशी लग्न करणारा गोविंद आधीच विवाहित असल्याचं समोर आलं.
गोविंदने संगीता आणि पहिल्या पत्नीला घराबाहेर बाहेर काढलं आणि स्वतःहून निघून गेला. हे संपूर्ण प्रकरण दरभंगाच्या बाकरगंज परिसरातील आहे. येथे राहणारा गोविंद एका खासगी बँकेत काम करतो. गोविंदने आठ वर्षांपूर्वी दरभंगा येथील प्रेरणा कुमारीसोबत प्रेमविवाह केला होता. याच दरम्यान, त्यांची रक्सौल येथे बदली झाली. येथील वास्तव्यादरम्यान गोविंदची सोशल मीडियावर नेपाळमधील रहिवासी संगीता हिच्याशी मैत्री झाली.
मैत्रीचे रुपांतर प्रेमात झालं. संगीताने गोविंदला सर्व सत्य सांगितलं की, ती विवाहित असून दोन मुलांची आई आहे. पण गोविंदने त्याचंही लग्न झाल्याची गोष्ट लपवून ठेवली. तिने पतीला घटस्फोट द्यावा असं सांगितलं. मग तो तिच्याशी लग्न करेल असं म्हणाला. संगीताही गोविंदच्या बोलण्यात फसली. तिने आपल्या दोन्ही मुलांना सोडलं आणि पतीपासूनही घटस्फोट घेतला. यानंतर तिने गोविंदसोबत मंदिरात लग्न केलं. ती रक्सौलमध्ये गोविंदसोबत राहू लागली. गोविंदची पोस्टिंग समस्तीपूरमध्ये झाली होती. इथे येताच गोविंद बदलला.
संगीताशी बोलणं बंद केलं. तो तिच्यापासून अंतर ठेवू लागला. संगीताला ही गोष्ट फार विचित्र वाटली. तिला रक्सौल येथील बँकेच्या शाखेतून गोविंदचा खरा पत्ता मिळाला. पत्ता मिळताच संगीता दरभंगा येथे पोहोचली तेव्हा गोविंदचे लग्न झाल्याचे समजताच तिला धक्काच बसला. पहिली पत्नी प्रेरणाने सांगितलं की, एक मूल एक वर्षाचं आणि एक दोन वर्षांचं आहे. घरात बराच गोंधळ झाला. संगीताने लग्नाचे व्हिडीओ आणि फोटोही दाखवले. यानंतर प्रकरण इतके वाढले की गोविंदने संगीता आणि प्रेरणा यांना घराबाहेर बाहेर काढलं आणि स्वतः फरार झाला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.