शहरं
Join us  
Trending Stories
1
"बुलडोझर कुठे चालवायचा? याचं ट्यूशन योगीजींकडून घ्या..."; पंतप्रधान मोदींनी या दोन पक्षांना दिला सल्ला!
2
पहिली बँटींग, दुसरी बँटींग? RCB कन्फ्युज! कसं जुळवणार Playoffs चं गणित? लै झंझट
3
"तुम्‍हारी नौकरी खाऊंगी..."; मुख्यमंत्री निवासस्थानातील स्वाती मालिवाल यांचा धक्कादायक व्हिडीओ समोर
4
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला
5
‘नेहमीप्रमाणे राजकीय हिटमॅनने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला’, त्या व्हिडीओवरून स्वाती मालिवाल यांचं प्रत्युत्तर
6
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
7
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी
8
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
9
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
10
रोहित, हार्दिक यांना Mumbai Indians संघात ठेवणार नाही, तर... ; वीरेंद्र सेहवागचा दावा
11
"मला एका मोठ्या पक्षाकडून लोकसभेची ऑफर होती, पण...", किरण मानेंचा गौप्यस्फोट
12
Mahindra & Mahindra च्या शेअरवर गुंतवणूकदार तुटून पडले; एक्सपर्ट म्हणाले, "₹२९०० पर्यंत..."
13
बाहुबलीच्या आयुष्यात होणार देवसेनाची एन्ट्री?; प्रभासची क्रिप्टिक पोस्ट चर्चेत
14
३.५ किलो वजन, १२०० रुपये किंमत, या दुर्मीळ आंब्याची उरलीत केवळ १० झाडं, मध्य प्रदेश सरकार चिंतीत 
15
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
16
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू
17
ईडीने जप्त केलेले पैसे लोकांना वाटणार? मोदी म्हणाले,"कायद्यात बदल करुन मी..."
18
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
19
३ राशींची साडेसाती: कधी होईल मुक्तता? ‘हे’ उपाय करुन पाहा, शनीदेवाची कृपा मिळवा
20
IPO प्राईजच्या ५ पट झाला 'हा' शेअर, जबरदस्त नफ्यानंतर विक्रमी उच्चांकाच्या जवळ स्टॉक 

ना NDA, ना INDIA...मायावतींनी पुढचा प्लॅन सांगितला; लोकसभेसाठी बसपाची मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2024 2:53 PM

९० च्या दशकात आमच्यासोबत झालेल्या आघाडीचा समाजवादी पार्टी आणि काँग्रेसला फायदा झाला होता असं मायावतींनी सांगितले.

नवी दिल्ली - आगामी २०२४ च्या निवडणुकीसाठी एकीकडे भाजपा जोरदार तयारी करत आहे तर दुसरीकडे विरोधी पक्षही इंडिया आघाडीच्या माध्यमातून मोदींचा पराभव करण्याची रणनीती आखत आहेत. त्यातच इंडिया आघाडीला आज मोठा धक्का बसला आहे. कारण बसपा प्रमुख मायावती यांनी आगामी निवडणुकीत स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती यांनी वाढदिवसानिमित्त पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी मायावती यांनी भाजपासह समाजवादी पार्टी आणि काँग्रेसवरही निशाणा साधला. 

मायावती म्हणाल्या की, आम्ही उत्तर प्रदेशात स्वबळावर निवडणूक लढवून सरकार बनवलं होते. त्याचा आधार घेत येत्या निवडणुकीत आम्ही स्वबळावर निवडणूक लढवू. आम्ही कुठल्याही पक्षासोबत युती किंवा आघाडी करणार नाही. आमचा पक्ष स्वबळावर निवडणूक लढवू शकतो कारण पक्षाचे नेतृत्व एका दलिताच्या हाती आहे. आघाडी केल्यानंतर बसपाची मते विरोधी पक्षांना मिळतात परंतु दुसऱ्याची मते आम्हाला मिळत नाही. ९० च्या दशकात आमच्यासोबत झालेल्या आघाडीचा समाजवादी पार्टी आणि काँग्रेसला फायदा झाला होता. ईव्हीएममुळे फेरफार होत असल्याने बीएसपीला नुकसान होत आहे. ईव्हीएम मतदान बंद केले पाहिजे. आघाडीचं आम्हाला नुकसान होतं त्यामुळे देशातील बहुतांश पक्ष बीएसपीसोबत आघाडी करायला बघतात. परंतु निवडणुकीनंतर आम्ही आघाडीचा विचार करू असं त्यांनी स्पष्ट केले. 

इंडिया आघाडीच्या दिल्लीतील बैठकीत सपा प्रमुख अखिलेश यादव यांनी बसपासोबत चाललेल्या चर्चेवर कठोर भूमिका घेतली. जर मायावती आघाडीत आल्या तर त्यांच्या पक्षाचा अजेंडा स्पष्ट असायला हवा असं अखिलेशनं म्हटलं. त्यावर अखिलेश यादव हा सरडा आहे. वेळोवेळी रंग बदलतो अशा शब्दात पलटवार केला. काँग्रेस, भाजपा आणि त्यांच्या सहकारी पक्षांचा विचार धार्मिक आहे. दलित आणि मागासवर्गीय समाजाला त्यांच्या पायावर उभं राहताना हे पक्ष पाहू शकत नाही. आरक्षणाचा पूर्ण लाभही घेऊन देत नाही असा आरोप मायावती यांनी पक्षावर केला. 

इतकेच नाही तर सर्व पक्ष आतमधून एकत्र येत साम दाम दंड भेदचा वापर करून दलितांना सत्तेबाहेर ठेवू इच्छितात. या पक्षांपासून सावध राहणे आणि बसपाला साथ देण्याची गरज आहे.  अखिलेश यादव सरड्याप्रमाणे रंग बदलतात. त्यांच्यापासून सतर्क राहायला हवे असं सांगत मायावती यांनी इंडिया आघाडीत सहभागी होण्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला. लोकसभा निवडणुकीत बसपा स्वबळावर निवडणूक लढवणार. केंद्र आणि राज्यातील सरकार धर्म आणि संस्कृतीच्या आडून राजकारण करत आहेत ज्यामुळे लोकशाही कमकुवत होतेय असा आरोपही मायावती यांनी केला आहे. 

टॅग्स :Bahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टीmayawatiमायावतीINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीNational Democratic Allianceराष्ट्रीय लोकशाही आघाडी