ना घोडा... ना कार... ना हेलिकॉप्टर, अशी वरात घेऊन आला नवरदेव, सासरचे म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 13:07 IST2025-01-22T13:05:43+5:302025-01-22T13:07:05+5:30
Marriage News: मध्य प्रदेशमधील भिलवाडा येथे एका गावात अगदी आगळीवेगळ्या आणि लक्षवेधी वरातीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. आधुनिकतेच्या या काळात जिथे लोक वरातीमध्ये महागड्या गाड्या आणि भव्य सजावट करतात. तिथे येथे सजवलेला बैलगाडीमधून वरात काढली.

ना घोडा... ना कार... ना हेलिकॉप्टर, अशी वरात घेऊन आला नवरदेव, सासरचे म्हणाले...
लग्न सोहळ्यामध्ये वरात ही खास आकर्षणाचं केंद्र असते. सर्वसाधारणपणे वरातीमध्ये नवरदेव हा सर्वसाधारणपणे घोडा किंवा महागड्या गाड्यांमधून येतो. काही ठिकाणी नवरदेव हेलिकॉप्टरने रॉयल एंट्री घेतो. मात्र मध्य प्रदेशमधील भिलवाडा येथे एका गावात अगदी आगळीवेगळ्या आणि लक्षवेधी वरातीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. आधुनिकतेच्या या काळात जिथे लोक वरातीमध्ये महागड्या गाड्या आणि भव्य सजावट करतात. तिथे येथे सजवलेला बैलगाडीमधून वरात काढली.
भीलवाडा जिल्ह्यातील रायपूर येथून सुमारे १५ किमी दूर अंतराव असलेल्या कोशीथल येथे एक आगळीवेगळी वरात पाहायला मिळाली. येथे एका सजवलेल्या बैलगाडीमधून नवरदेव आपली होणाऱ्या पत्नीच्या घरी रायपूरमधील सूरजपुरा गावात पोहोचला. येथील मांगी लाल जाट यांच्या घरी ही वरात पोहोचली. पारंपरिक रीतीरिवाज कायम ठेवताना नवरदेव बैलगाडीमधून वरात घेऊन पोहोचला.
आजच्या आधुनिक काळात लग्नसोहळे महागडे आणि खर्चिक होत असताना जाट समाजामध्ये काही रीतीरिवाज परंपरा अद्याप कायम आहेत. हीच प्रथा जिवंत ठेवताना जाट समाजाकडून बैलगाडीला सजवून वरात काढण्यात आली. तसेच ही वरात ही सर्वांच्याच आकर्षणाचा विषय ठरली.