NEET Result 2020 : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! लवकरच नीट परीक्षेचा निकाल होणार जाहीर, असा करा चेक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2020 03:02 PM2020-10-10T15:02:45+5:302020-10-10T15:08:21+5:30

NEET Result 2020 : नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) लवकरच नीट 2020 चा निकाल आपली अधिकृत वेबसाईट ntaneet.nic.in वर जाहीर करू शकते.

NEET 2020 result expected soon at ntaneet.nic.in; details you should know | NEET Result 2020 : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! लवकरच नीट परीक्षेचा निकाल होणार जाहीर, असा करा चेक

NEET Result 2020 : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! लवकरच नीट परीक्षेचा निकाल होणार जाहीर, असा करा चेक

Next

नवी दिल्ली - नीट परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. लवकरच नीट परीक्षेचा निकाल जाहीर होणार आहे. लाखो विद्यार्थी निकालाची अनेक दिवसांपासून वाट पाहत आहेत. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) लवकरच नीट 2020 चा निकाल आपली अधिकृत वेबसाईट ntaneet.nic.in वर जाहीर करू शकते. शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी नीट परीक्षेच्या निकालाबाबत माहिती दिली आहे. नीट परीक्षेचा निकाल जाहीर करण्यास उशीर होणार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नीट परीक्षेचा निकाल (NEET Exam Result 2020) हा 12 ऑक्टोबरच्या आधी जाहीर केला जाऊ शकतो. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना रोल नंबर, जन्मतारीख आणि सिक्यॉरिटी पिन आवश्यक आहे.  नीट परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर एनटीए कॅटेगिरीनुसार कट ऑफ स्कोअर जाहीर केला जाणार आहे. देशभरात 13 सप्टेंबर रोजी जवळपास 3,843 परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली. मात्र यंदा 90 टक्के विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. जवळपास 15.97 लाख विद्यार्थ्यांनी नीट परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन केलं होतं. 

असा चेक करा निकाल

- सर्वप्रथम नीटच्या ntaneet.nic.in या अधिकृत वेबसाईटवर जा.

- नीट अ‍ॅप्लिकेशन नंबर, जन्मतारीख आणि सिक्यॉरिटी पिन टाकून सबमिट करा.

- नीट 2020 चा निकाल आपल्या स्क्रीनवर दिसेल. 

- रिझल्ट डाऊनलोड करुन सेव्ह करा आणि त्याची प्रिंटआऊटही काढा.

Web Title: NEET 2020 result expected soon at ntaneet.nic.in; details you should know

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.