शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

किसमें कितना हैं दम! NDA सोबत ३८, तर INDIAमध्ये २६ पक्ष सहभागी; कोण ठरणार किंगमेकर? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2023 21:06 IST

NDA Vs India: कोण किंगमेकर ठरेल, NDA की INDIA कोणात जास्त दम आहे, जाणून घ्या...

NDA Vs India: २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी NDA आणि विरोधक INIDA यांनी एकमेकांविरोधात शड्डू ठोकल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपविरोधी पक्षांची एक बैठक बंगळुरूत असून, विरोधकांना चितपट करत शक्तिप्रदर्शन करण्यासाठी NDA ची एक बैठक दिल्लीत होत आहे. या दोन्ही बैठकांना दिग्गज राजकारण्यांनी हजेरी लावली आहे. देशभरातील ३८ पक्ष एनडीएसोबत असून, २६ पक्षांनी विरोधी गट इंडियाला पाठिंबा दिल्याचे पाहायला मिळत आहे. यातच कोण किंगमेकर ठरेल, एनडीए की इंडिया कोणात जास्त दम आहे, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा होऊ लागली आहे. 

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांची एकजुट तर होत आहे. पण २०१९च्या निवडणुकीनंतर एनडीएतून अनेक पक्ष बाहेर पडले होते. त्यामुळे मोठा विजय मिळवण्यासाठी एनडीएची तितकी ताकद राहिली आहे का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. 

NDA सोबत कोणते पक्ष आहेत?

NDA - भाजप, शिवसेना (एकनाथ शिंदे), रालोपा (पारस), लोपा (पासवान), अपना दल (सोनेलाल), AIDMK, आरपीआय (आठवले), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), एनपीपी, एनडीपीपी, एसकेएम, आयएमकेएमके, आजसू, एमएनएफ, एनपीएफ, जेजेपी, आयपीएफटी (त्रिपुरा), बीपीपी, पीएमके, एमजीपी, एजीपी, निषाद पार्टी, युपीपीएल, एआयआरएनसी, टीएमसी (तमिळ मनिला काँग्रेस), शिरोमणी अकाली दल संयुक्त, जनसेना, हम, रालोसपा, सुभासपा, बीडीजेएस (केरळ), केरळ काँग्रेस (थॉमस), गोरखा नॅशन लिबरेशन फ्रन्ट, जनातिपथ्य राष्ट्रीय सभा, युडीपी, एचएसडीपी, जनसुराज पार्टी, प्रहार जनशक्ती पार्टी.

INDIA ला पाठिंबा दिलेले पक्ष कोणते?

INDIA - काँग्रेस, द्रमुक, तृणमूल काँग्रेस, जदयू, शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), सीपीएम, सपा, इंडियन युनियन मुस्लीम लीग, सीपीआय, आप, झारखंड मुक्ती मोर्चा, केरळ काँग्रेस (एम), राजद, नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपी, सीपीआय (एमएल), आरएलडी, एमएमके, एमडीएमके, वीसीके, आरएसपी, केएमडीके, केरळ काँग्रेस, अपना दल (कमेरावादी) आणि एआयएफबी.

NDA की INDIA कोण बाजी मारणार?

सन २०१९ च्या लोकसभा निकालाची आकडेवारी आणि मतांची टक्केवारी पाहिल्यास, या निवडणुकीत भाजपप्रणित एनडीएला ३५३ जागांवर विजय मिळाला होता. पैकी भाजपला ३७.७ टक्के मते मिळाली होती. तर एनडीएला एकत्रित ४५ टक्के मतदान झाले होते. बिगर एनडीएतील पक्षांना ५५ टक्के मतदान झाले होते. २०१९च्या निवडणुकीत काही विरोधी पक्ष एकत्रित तर काही स्वतंत्रपण लढले होते. यामध्ये काँग्रेसला ५२ जागा मिळाल्या होत्या. या निवडणुकीत काँग्रेसला विरोधीपक्ष नेतेपदावर दावा करण्यासाठी १० टक्के जागा कमी पडल्या होत्या. INDIA या आघाडीतील पक्षांचे मिळून १५० खासदार आहेत.

दरम्यान, एनडीएमध्ये समाविष्ट झालेल्या ३८ पक्षांपैकी ६५ टक्के पक्षांकडे एकही लोकसभेची जागा नाही. तर दुसरीकडे INDIAच्या बैठकीत समाविष्ट झालेल्या २६ पक्षांपैकी ५० टक्क्यांहून अधिक पक्षांकडे लोकसभेत एकही खासदार नाही. बिगर एनडीए पक्ष एकत्र येऊन लढले तर एनडीएपेक्षा वरचढ ठरू शकतात, असे म्हटले जात आहे. 

 

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेसPoliticsराजकारण