शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

विरोधकांची पुढील बैठक मुंबईत; दिल्लीत उभारणार सचिवालय, 'INDIA' नावावर एकमत, खर्गेंची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2023 17:00 IST

विरोधकांच्या आघाडीचे नवे नाव 'INDIA'. विरोधी आघाडीचा प्रमुख मुंबईतील बैठकीत ठरेल.

NDA vs INDIA Opposition Meeting : 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी विरोधकांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील भाजपला रोखण्यासाठी आज बंगळुरुत विरोधकांची बैठक पार पडली. या बैठकीत विरोधी ऐक्याला नवीन नाव देण्यात आले आहे. पूर्वी UPA नावाखाली एकत्र येणारे विरोधक आता INDIA या नावाखाली एकत्र येत आहेत. बैठकीनंतर बोलताना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी भाजपवर जोरदार टीका केली. 

पुढील बैठक मुंबईतभाजपविरोधातील आघाडीला INDIA (Indian National Developmental Inclusive Alliance) नाव देण्यात आले आहे. बंगळुरुमध्ये 26 विरोधी पक्षांच्या बैठकीनंतर एकाच व्यासपीठावर येऊन संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खर्गे यांनी या आघाडीच्या नावाची औपचारिक घोषणा केली. यावेळी त्यांनी आजची बैठक यशस्वी झाल्याचे सांगून पुढील बैठक मुंबईत होणार असून 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी दिल्लीत सचिवालय स्थापन करण्यात येणार असल्याचेही सांगितले. याशिवाय, 11 जणांची समितीही स्थापन होणार आहे. या समितीत कोण असेल, हे लवकरच ठरवले जाईल.

खर्गेंची भाजपवर टीकायावेळी खर्गेंनी भाजपवरही जोरदार टीका केली. ते म्हणाले, एनडीए 30 पक्षांसोबत बैठक घेत आहे. मी भारतात इतके पक्ष कधीच ऐकले नाहीत. आधी त्यांनी एकही सभा घेतली नाही पण आता ते एकामागून एक बैठका घेत आहेत. पंतप्रधान मोदी आता विरोधी पक्षांना घाबरले आहेत. आज संपूर्ण मीडियावर पंतप्रधान मोदींचा ताबा आहे. त्यांच्या आदेशानेच सर्वकाही होते. आज विरोधकांचा आवाज दाबला जात आहे. माझ्या 52 वर्षांच्या कारकिर्दीत मी अशी परिस्थिती कधीच पाहिली नाही. लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी आम्ही येथे जमलो आहोत, असं खर्गे म्हणाले.  

टॅग्स :congressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेNarendra Modiनरेंद्र मोदीMumbaiमुंबईBJPभाजपाlok sabhaलोकसभा