शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

देशात पुन्हा ‘एनडीए’ पर्व, नरेंद्र मोदींना सरकार स्थापनेचे निमंत्रण; एनडीएच्या नेतेपदी एकमताने निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2024 07:51 IST

तिसऱ्यांदा घेणार पंतप्रधानपदाची शपथ; पंडित नेहरुंच्या विक्रमाशी हाेणार बराेबरी

- संजय शर्मानवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी (दि. ९) सायंकाळी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेऊन दिवंगत जवाहरलाल नेहरू यांच्या विक्रमाची बरोबरी करतील. एनडीएने शुक्रवारी मोदींची एकमताने नेतेपदी निवड केली. त्यानंतर एनडीए नेत्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला. 

मोदी रविवारी सायंकाळी ७ वाजून १५ मिनिटांनी शपथ घेतील. शुक्रवारी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये एनडीए संसदीय पक्षाच्या बैठकीत घटकपक्ष आणि भाजपच्या खासदारांनी सर्वसंमतीने मोदींची नेतेपदी निवड केली. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी नरेंद्र मोदींचा एनडीएचे नेते म्हणून प्रस्ताव मांडला. त्याला सर्व घटक पक्षांच्या नेत्यांनी अनुमोदन दिले. नेतेपदी निवड झाल्यानंतर मोदींचे सर्व नेत्यांनी स्वागत केले. 

एनडीए संसदीय पक्षाच्या बैठकीनंतर केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्यासह एनडीएचे नेते चंद्राबाबू नायडू, नितीश कुमार यांनी राष्ट्रपती भवनात जाऊन  राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. त्यांनी एनडीएच्या २९३ खासदारांच्या पाठिंब्याचे पत्र राष्ट्रपतींना सुपुर्द करत सरकार स्थापनेचा दावा सादर केला. रविवारी मोदी शपथ घेतील, असे केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितले. मोदींसह त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्रीही शपथ घेतील, असे ते म्हणाले. 

भाजप स्वत:कडे काेणती महत्त्वाची खाती ठेवणार?मोदी यांच्यासह एनडीए सरकारचे तीन ते चार डझन मंत्री ९ जून रोजी शपथ घेऊ शकतात. शिंदेसेना आणि अजित पवार गट यांना प्रत्येकी एक मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. चंद्राबाबू नायडू यांच्या तेलुगू देसम पक्षाने चार मंत्रिपदांची मागणी केली आहे. आत्तापर्यंत भाजपने तीन केंद्रीय मंत्रीपदे देण्याचे मान्य केले आहे. त्यापैकी आयटी, दूरसंचार, ग्रामीण विकास, शहरी विकास आणि अर्थ मंत्रालयाची मागणी पुढे आली आहे. जदयुला ३ कॅबिनेट मंत्रिपदे मिळू शकतात. कृषी, रेल्वे आणि वित्त विभागाची मागणी जदयुकडून आली आहे. सभापतीपदासह गृह, परराष्ट्र, अर्थ आणि संरक्षण मंत्रालये भाजप आपल्याकडे कायम ठेवेल, असा अंदाज आहे.

१८व्या लोकसभेत आहे नवी ऊर्जा : मोदीराष्ट्रपती भवनाबाहेर मोदी यांनी सांगितले की भारताला स्वातंत्र्यप्राप्ती झाली, त्या घटनेला २०४७ साली शंभर वर्षे पूर्ण होणार आहेत. देशाने अनेक स्वप्ने उराशी बाळगली आहेत. त्यांची २०४७पर्यंत पूर्तता व्हावी यासाठी १८वी लोकसभा हा महत्त्वाचा मैलाचा दगड आहे. 

मुख्यमंत्री शिंदेंनी दिले कवितेतून अनुमोदनसंसदीय पक्षनेतेपदी नरेंद्र मोदी यांच्या नावाचे अनुमाेदन करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक कविता सादर केली.‘मैं उस माटी का वृक्ष नही जिसको नदियों ने सींचा हैबंजर माटी में पलकर मैं मृत्यु से जीवन खींचा हैमैं पत्थर पर लिखी इबारत हूं शीशे से कब तक तोडोगेमिटनेवाला मैं नाम नहीं तुम मुझको कब तक रोकोगे’

प्रादेशिक आकांक्षा आणि राष्ट्रीय हितसंबंधांचा समतोल राखणे आवश्यक आहे. आज भारताकडे योग्य वेळी योग्य नेता आहे, ते म्हणजे नरेंद्र मोदी. भारतासाठी ही खूप चांगली संधी आहे. आता ही संधी गमावली तर कायमचा पश्चाताप होईल.    - चंद्राबाबू नायडू,     अध्यक्ष, तेलुगू देसम पार्टी 

पंतप्रधान मोदी भारताचा मोठ्या प्रमाणावर विकास करतील आणि बिहारकडेही लक्ष देतील. त्यांना आम्ही मनापासून साथ देऊ. मोदींच्या कार्यकाळात आपला पक्ष सदैव भाजपच्या पाठीशी उभा राहील. मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होत आहेत ही आनंदाची बाब आहे. -नितीशकुमार, जदयु प्रमुख 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकाल