Tamil Nadu Stampede: हेमा मालिनींच्या नेतृत्वात एनडीएचे शिष्टमंडळ करणार ४१ जणांच्या मृत्यूची चौकशी; पीडित कुटुंबांची घेणार भेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 17:21 IST2025-09-29T17:13:48+5:302025-09-29T17:21:58+5:30
Karur Stampede: तमिळनाडूमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर भाजपने शिष्टमंडळाद्वारे या प्रकरणाची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे.

Tamil Nadu Stampede: हेमा मालिनींच्या नेतृत्वात एनडीएचे शिष्टमंडळ करणार ४१ जणांच्या मृत्यूची चौकशी; पीडित कुटुंबांची घेणार भेट
Tamil Nadu Karur Stampede: तामिळनाडूच्या करुरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत ४१ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर अनेकजण जखमी झाले आहे. तमिलगा वेट्टी कझगमचा प्रमुख आणि अभिनेता विजय याने नमक्कल येथे रॅलीचे आयोजन केले होते. या रॅलीदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत ही भीषण घटना घडली. या चेंगराचेंगरीची भाजपने गंभीर दखल घेतली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी मृतांप्रती तीव्र शोक व्यक्त केला आहे आणि जखमींना लवकर बरे व्हावे अशी प्रार्थना केली आहे. त्यांनी घटनास्थळाला भेट देण्यासाठी, परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि पीडित कुटुंबांना भेटण्यासाठी एनडीए-भाजप खासदारांचे आठ सदस्यीय शिष्टमंडळ तयार केले आहे.
तमिळनाडूत झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेवर भाजप अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांनी दुःख व्यक्त करत मृतांना श्रद्धांजली वाहिली. जेपी नड्डा यांनी तामिळनाडूतील करूरला भेट देण्यासाठी एनडीएचे एक शिष्टमंडळ स्थापन केले आहे. ते चेंगराचेंगरीला कारणीभूत असलेल्या परिस्थितीची चौकशी करतील, पीडित कुटुंबांना भेटतील आणि लवकरात लवकर अहवाल सादर करतील.
या शिष्टमंडळात खासदार हेमा मालिनी निमंत्रक असतील, तर अनुराग ठाकूर, तेजस्वी सूर्या, ब्रिजलाल, शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे, खासदार अपराजिता सारंगी, खासदार रेखा शर्मा आणि तेलुगू देसम पक्षाचे (टीडीपी) पुट्टा महेश कुमार सदस्य असतील. हे सर्व सदस्य एकत्रितपणे घटनेच्या सर्व पैलूंची चौकशी करतील.
करूर येथे टीव्हीके पक्षाच्या रॅलीदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीमुळे राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती आणि प्रमुख कार्यक्रमांसाठीच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. भाजपसह विरोधी पक्ष आता या मुद्द्यावर सक्रिय झाले आहेत आणि सत्य उघड करण्यासाठी थेट चौकशीचा आग्रह धरत आहेत.
BJP president JP Nadda has constituted a NDA delegation to visit Karur in Tamil Nadu to look into the circumstances which led to the stampede, meet the affected families and submit its report at the earliest. pic.twitter.com/8Gkoc2Edbv
— Press Trust of India (@PTI_News) September 29, 2025
दरम्यान, करूर चेंगराचेंगरीच्या घटनेत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. एफआयआरमध्ये जिल्हा सचिव, राज्य सरचिटणीस आणि राज्य सहसचिव सीटीआर निर्मल कुमार यांची नावे आहेत. या सर्वांवर भारतीय दंड संहिता आणि तामिळनाडू सार्वजनिक मालमत्ता कायद्यांतर्गत आरोप ठेवण्यात आले आहेत.