शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

एनडीए ३९७ पार! एक्झिट पोलनंतर लगेचच e-मतदानाचा निकाल आला; पहा महाराष्ट्रात काय परिस्थिती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2024 18:13 IST

शनिवारी मतदानाचा अखेरचा टप्पा संपताच विविध चॅनेल्स, संस्थांनी त्यांचे एक्झिट पोल जाहीर केले. यामध्ये भाजपा युतीला बहुमत मिळताना दाखविण्यात आले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या निकालाला अवघे दोन दिवस राहिले आहेत. शनिवारी मतदानाचा अखेरचा टप्पा संपताच विविध चॅनेल्स, संस्थांनी त्यांचे एक्झिट पोल जाहीर केले. यामध्ये भाजपा युतीला बहुमत मिळताना दाखविण्यात आले आहे. तर या एक्झिट पोलनंतर लगेचच लोकसभा निवडणुकीसाठी घेतलेल्या ई मतदानाचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. 

आजतकने हे ई मतदान घेतले आहे. भाजपाने यावेळी ४०० पारचा नारा दिला होता. या मतदानात भाजपाप्रणित एनडीएला ३९७ जागा मिळताना दिसत आहेत. एनडीएला जवळपास ७३ टक्के लोकांनी मत दिले आहे. तर इंडिया आघाडीला २३ टक्के मते मिळाली आहेत. ४ टक्के मते इतरला मिळाली आहेत. ही मते जागांमध्ये वाटल्यानंतर भाजपा युतीला ३९७ जागा मिळत आहेत. तर इंडिया आघाडीला १२१ जागा मिळताना दिसत आहेत. इतरांच्या वाट्याला २५ जागा दिसत आहेत. 

हे मतदान काही खरे नसले तरी इंटरनेटवर असणाऱ्या लोकांचा मुड जाणून घेण्यासाठी घेण्यात आले होते. या काळात १.३० लाख लोकांनी त्यांचे त्यांचे राज्य निवडून, मोबाईल नंबर भरून त्या त्या पक्षाला मतदान केले आहे. दिल्लीत एक्झिट पोलप्रमाणेच या मतदानातही भाजपला सहा जागा मिळतील आणि इंडी आघाडीला एक जागा मिळण्याची शक्यता आहे. 

राजस्थानमध्ये एनडीएला 18 तर काँग्रेसला 6 जागा मिळण्याचा अंदाज आहे. उत्तर प्रदेशमध्ये एनडीएला 57 जागा मिळू शकतात तर इंडी आघाडीला 20 जागा मिळू शकतात तर इतरांना तीन जागा मिळू शकतात. दक्षिण भारतात, इंडी आघाडी आणि भाजप यांच्यात चुरशीची स्पर्धा आहे. मात्र, केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये भाजपला सर्वाधिक मते मिळाली आहेत. 

भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या ईशान्येकडील राज्यांत इंडी आघाडीच्या बाजूने लाट दिसून आली आहे. मणिपूर, मिझोराम आणि नागालँडमध्ये काँग्रेसला सर्वाधिक मते मिळाली आहेत. आसाममधील बहुतांश लोकांनी भाजपच्या बाजूने मतदान केले आहे. बिहारमध्ये एनडीएला 29, इंडी आघाडीला 9 आणि इतरांना 2 जागा मिळताना दिसत आहेत. 

महाराष्ट्रात काय...महाराष्ट्रात एक्झिट पोलनी एनडीए आणि इंडी आघाडीत चुरस दाखविलेली असताना ई मतदानात मात्र एनडीएच्या बाजुने ७० टक्के मते गेली आहेत. इंडी आघाडीला २८ टक्के मते आहेत. इतरांना तीन टक्के मते मिळाली आहेत. यानुसार ४८ पैकी ३३ जागा एनडीएला, मविआला १३ आणि इतरांना १ जागा मिळताना दिसत आहे.  

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपाcongressकाँग्रेसmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४