शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
3
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
4
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
5
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
6
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
7
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
8
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
9
Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
12
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
13
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
14
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
15
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
16
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
17
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
18
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
19
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
20
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन

गरीब सवर्णांचं आरक्षण जुमला ठरू नये- सुप्रिया सुळे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2019 8:11 PM

धनगरांना आरक्षण कधी देणार; सुळेंचा सवाल

नवी दिल्ली: आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या सवर्णांना आरक्षण देणारं विधेयक मोदी सरकारनं आज लोकसभेत मांडलं. हे विधेयक जुमला ठरू नये, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनी लगावला. राष्ट्रवादी काँग्रेस या विधेयकाला पाठिंबा देते. मात्र हे विधेयक संसदेच्या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी का मांडण्यात आलं, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मोदी सरकारनं गरीब सवर्णांना आरक्षण देणारं विधेयक आणलं. मात्र हे आरक्षण निवडणुकीसाठीचा जुमला ठरू नये, असा चिमटा सुळेंनी काढला. हे विधेयक सरकारकडून अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी का मांडलं गेलं, असा प्रश्न त्यांनी विचारला. यावेळी त्यांनी सरकारला धनगर आरक्षणाची आठवण करून दिली. महाराष्ट्रातला धनगर समाज गेल्या अनेक वर्षांपासून आरक्षण मागत आहे. त्यांना आरक्षण कधी मिळणार, असा सवाल सुळेंनी लोकसभेत उपस्थित केला. त्यावर या प्रकरणी सर्वेक्षण सुरू असल्याचं उत्तर केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी दिलं.सुप्रिया सुळेंच्या प्रश्नाला उत्तर देताना रामविलास पासवान एका इंग्रजी म्हणीचा वापर केला. व्हेअर देअर इज अ विल, देअर इज अ वे, या म्हणीत पासवान यांनी थोडा बदल केला. 'मी रेल्वे मंत्री असताना आमच्या विभागात एक वाक्य गमतीनं वापरलं जायचं. व्हेअर देअर इज अ विल, देअर इज अ रेल्वे; अँड व्हेअर इज नो विल, देअर इज ओन्ली सर्व्हे,' असं पासवान म्हणाले. त्यावर धनगर समाजाला आरक्षण देण्यात सरकारचं विल म्हणजेच इच्छाशक्ती कमी पडते आहे का, असा प्रश्न सुळेंनी विचारला.  

टॅग्स :reservationआरक्षणSupriya Suleसुप्रिया सुळेNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाlok sabhaलोकसभाParliamentसंसद