शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

रणनीतीसाठी राष्ट्रवादीची दिल्लीत बैठक, पाच राज्यांतील विधानसभा तसेच लाेकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी खलबते

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2023 07:24 IST

NCP: कॉन्स्टिट्यूशन क्लब येथे दिवसभर राष्ट्रवादी महिला काँग्रेस, राष्ट्रवादी युवक काँग्रेस आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या स्वतंत्र बैठका झाल्या.

- सुनील चावके नवी दिल्ली  - पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका आणि त्यापाठोपाठ होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीविषयी चर्चा करण्यासाठी तसेच पक्षकार्याचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी कॉन्स्टिट्यूशन क्लब येथे राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या बैठकी झाल्या. या बैठकांसाठी विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांना निमंत्रित करण्यात आलेले नव्हते; तसेच त्यांचा पोस्टर्सवर चेहराही झळकला नाही, याचीच चर्चा सुरू होती.

कॉन्स्टिट्यूशन क्लब येथे दिवसभर राष्ट्रवादी महिला काँग्रेस, राष्ट्रवादी युवक काँग्रेस आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या स्वतंत्र बैठका झाल्या. या बैठकींना नवनियुक्त कार्यकारी अध्यक्ष सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल, जितेंद्र आव्हाड तसेच अन्य राष्ट्रीय पदाधिकारी उपस्थित होते. 

अजितदादांना निमंत्रणच नव्हते- या बैठकीसाठी ठिकठिकाणी लावण्यात आलेल्या पोस्टर्सवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे छायाचित्र नव्हते आणि त्यांना या बैठकीसाठी निमंत्रितही करण्यात आले नव्हते, याकडे पटेल यांचे लक्ष वेधले असता या बैठकीशी अजित पवार यांचा संबंधच येत नाही. nते पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य असले तरी राष्ट्रीय पदाधिकारी नाहीत. राष्ट्रीय कार्यकारिणीच्या कोणत्याही सदस्याला आजच्या बैठकीचे निमंत्रण नव्हते, असे त्यांनी स्पष्ट केले.

प्रदेशाध्यक्ष कधी ठरणार?महाराष्ट्रात जिल्ह्याजिल्ह्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. ती पूर्ण झाल्यानंतर कोणाला प्रदेशाध्यक्ष करायचे हा विषय येईल. आज कोणी इच्छा व्यक्त केली तर त्याविषयी उद्याच निर्णय होईल असे समजायचे कारण नाही. पक्ष त्याविषयी योग्य निर्णय घेईल, असे प्रदेशाध्यक्षपदाच्या मुद्द्यावर बोलताना पटेल म्हणाले.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवार