शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

पीएम केअरच्या निकामी व्हेंटिलेटर प्रकरणाची चौकशी व्हावी : जयंत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2021 17:15 IST

Coronavirus Ventilators : यापूर्वी बहुतांश व्हेंटिलेटर्समध्ये आढळल्या होत्या त्रुटी. पीएम केअर्स फंडातील निधीतून महाराष्ट्राला मिळाले होते २०९१ व्हेंटिलेटर्स

ठळक मुद्देयापूर्वी बहुतांश व्हेंटिलेटर्समध्ये आढळल्या होत्या त्रुटी. पीएम केअर्स फंडातील निधीतून महाराष्ट्राला मिळाले होते २०९१ व्हेंटिलेटर्स

"पीएम केअरच्या माध्यमातून मिळालेल्या निकामी व्हेंटिलेटर प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली. तसंच यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोलही केला.

"पीएम केअरच्या माध्यमातून मराठवाड्याला मिळालेल्या १५० व्हेंटिलेटरपैकी ११३ व्हेंटिलेटर निकामी निघाल्याची बातमी ऐकली. यामुळे केंद्रीय आरोग्य विभागाच्या ढिसाळ कारभारावर प्रश्न उपस्थित झाला आहे. याची सखोल चौकशी व्हायला हवी. या मागचा सुत्रधार कोण ? कोण गैरफायदा घेत आहे ? याचा छडा लागायला हवा," असेही जयंत पाटील म्हणाले. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून यावर प्रतिक्रिया दिली. 

त्रुटी आढळल्यापीएम केअर्स निधीतून महाराष्ट्राला जवळपास २०९१ व्हेंटिलेटर मिळाले आहेत. मात्र, त्यातील तब्बल २७६ व्हेंटिलेटर विविध त्रुटींमुळे बंद असल्याचे आढळले होते, तर २३९ व्हेंटिलेटर वापराविना पडून असल्याचे लोकमतच्या चमूने राज्यभरातून मिळविलेल्या माहितीत आढळले होते. बहुतांश बंद व्हेंटिलेटरना ऑक्सिजन सेन्सर, कनेक्टरच नसल्याने ते वापरण्यायोग्य नाहीत. शिवाय, काहींची आयसीयूत वापरण्याची क्षमता नसल्याचेही स्पष्ट झाले होते. अनेक व्हेंटिलेटरमध्ये फ्यूज नसणे, वायर तुटणे, सिग्नल नसणे अशाही त्रुटी आढळल्या होत्या. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMaharashtraमहाराष्ट्रprime ministerपंतप्रधानMarathwadaमराठवाडाVidarbhaविदर्भ