शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा उद्या शपथविधी, शरद पवार उपस्थित राहणार; खरगे यांनी दिलं आमंत्रण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2023 14:52 IST

सिद्धरमैय्या यांचा मुख्यमंत्री म्हणून तर डीके शिवकुमार यांचा उपमुख्यमंत्रीपदाचा शपथविधी सोहळा २० मे रोजी दुपारी १२.३० वाजता होणार आहे.

नवी दिल्ली: कर्नाटकात सरकार स्थापनेचा फॉर्म्युला आता निश्चित झाला आहे.  सिद्धरामय्या यांच्या हाती मुख्यमंत्रिपदाची धुरा सोपवण्यात येणार आहे. तर दुसरीकडे डीके शिवकुमार यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपदाची सूत्रं सोपवली जाणार आहेत. याशिवाय २०२४च्या लोकसभा निवडणुकांपर्यंत डीके शिवकुमार प्रदेशाध्यक्ष म्हणून देखील कार्यरत राहणार आहे. 

सिद्धरमैय्या यांचा मुख्यमंत्री म्हणून तर डीके शिवकुमार यांचा उपमुख्यमंत्रीपदाचा शपथविधी सोहळा २० मे रोजी दुपारी १२.३० वाजता होणार आहे. त्यासाठी, देशातील काँग्रेसचे मुख्यमंत्री, वरिष्ठ पदाधिकारी, सर्वच राज्यांचे प्रदेशाध्यक्ष आणि गांधी कुटुंबीयांना निमंत्रण देण्यात येणार आहे. मात्र याचदरम्यान एक महत्वाची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवारकर्नाटक मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी फोन करुन शरद पवार यांना आमंत्रण दिले आहे. 

अडीच वर्षांच्या फॉर्म्युलाच्या चर्चा

डीके शिवकुमार यांच्या निकटवर्तीयांचा दावा आहे की, दोन्ही नेत्यांना मुख्यमंत्री होण्यासाठी प्रत्येकी अडीच वर्षे मिळतील, परंतु याला काँग्रेसच्या नेत्यांकडून अद्याप कोणताही दुजोरा मिळालेला नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, यावरील चर्चा २०२४च्या राष्ट्रीय निवडणुकांपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. मात्र, सिद्धरमय्या यांनी अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाचा फॉर्म्युला पूर्णपणे फेटाळून लावला. याबाबत आपल्याला काहीही माहित नसल्याचं त्यांनी सांगितलं.

सोनिया गांधींचा हस्तक्षेप

कर्नाटकात मध्यरात्री उशिरा सरकार स्थापनेचा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला. सोनिया गांधी यांच्या हस्तक्षेपानंतर कर्नाटकातील राजकीय संकट सुटलं आहे. शिवकुमार हे उपमुख्यमंत्रीपदासाठी तयार झाले आहे. तर सिद्धरामय्या कर्नाटकाचे नवे मुख्यमंत्री असतील.

टॅग्स :Karnatak Politicsकर्नाटक राजकारणKarnatakकर्नाटकSharad Pawarशरद पवारcongressकाँग्रेसMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गे