शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

नक्षलवाद्यांचा पत्रकाराला फोन, ताब्यात असलेल्या जवानाबाबत म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2021 08:59 IST

Naxals attack in Bijapur, Chhattisgarh : बिजापूरमधील चकमकीदरम्यान, नक्षलवाद्यांनी एका जवानाला ताब्यात घेऊन आपल्यासोबत नेले होते. तेव्हापासून या जवानाच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू आहेत.

रायपूर - शनिवार, ३ एप्रिल रोजी छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांशी (Naxals ) झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाचे २२ जवान शहीद झाले होते. या चकमकीदरम्यान, नक्षलवाद्यांनी एका जवानाला ताब्यात घेऊन आपल्यासोबत नेले होते. तेव्हापासून या जवानाच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, या जवानाबाबत आता नक्षलवाद्यांनी एका पत्रकाराला फोन करून माहिती दिली आहे.  (The Naxals called the journalist and told him about the one jawan is in their custody)बिजापूरमधील पत्रकार असलेल्या गणेश मिश्रा यांनी त्यांना नक्षलवाद्यांचा दोन वेळा फोन आल्याचा दावा केला आहे. ते म्हणाले की, मला नक्षलवाद्यांचा दोनवेळा फोन आला आहे. त्यांनी एक जवान आपल्या ताब्यात असल्याचे सांगितले आहे. या जवानाला गोळी लागली होती. त्याला वैद्यकीय उपचार देण्यात आले आहेत. त्याची दोन दिवसांत सुटका केली जाईल. या जवानाचे फोटो आणि व्हिडीओ लवकरच प्रसिद्ध केले जातील.  

छत्तीसगडमधील सुकमा आणि बिजापूर जिल्ह्यांच्या सीमेवरील जोनागुडा गावाजवळ सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली होती. या चकमकीत अनेक जवानांना वीरमरण आलं होतं. तर काही जवान जखमी झाले होते. या चकमकीनंतर सीआरपीएफच्या २१० कोब्रा बटालियनमधील जवान राकेश्वर सिंह मन्हास बेपत्ता असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. दरम्यान, नक्षल्यांच्या ताब्यात असलेल्या जवानाला सोडण्यासाठी त्यांनी काही अटी टाकल्या होत्या. त्यावर वाटाघाटी करण्यासाठी त्यांना मध्यस्थीची गरज भासत असल्याचे सांगितले होते.दरम्यान, या चकमकीनंतर मारल्या गेलेल्या जवानांकडील शस्त्रे नक्षल्यांनी पळवून नेली. त्यात १४ अत्याधुनिक रायफली आणि दोन हजारावर काडतुसांचा समावेश आहे. त्याचा एक फोटोही दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीचा प्रवक्ता विकल्प याने जारी केला आहे. 

टॅग्स :naxaliteनक्षलवादीPoliceपोलिसChhattisgarhछत्तीसगड