ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 13:27 IST2026-04-06T13:26:04+5:302026-04-06T13:27:07+5:30

Naxal Attack News: एकीकडे केंद्र सरकारकडून देशातून नक्षलवाद संपल्याची घोषणा केली गेली असतानाच आज ओदिशा-झारखंड सीमेवर असलेल्या सारंडाच्या घनदाट जंगलात नक्षलवाद्यांनी आयईडीद्वारे स्फोट घडवून आणला आहे. या स्फोटात एक जवान गंभीर जखमी झाला आहे.

Naxalites detonate blast on Odisha-Jharkhand border, one jawan injured | ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी

ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी

एकीकडे केंद्र सरकारकडून देशातून नक्षलवाद संपल्याची घोषणा केली गेली असतानाच आज ओदिशा-झारखंड सीमेवर असलेल्या सारंडाच्या घनदाट जंगलात नक्षलवाद्यांनी आयईडीद्वारे स्फोट घडवून आणला आहे. या स्फोटात एक जवान गंभीर जखमी झाला आहे. ही घटना पश्चिम सिंहभूम जिल्ह्याकील नक्षली कारवायांच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या भागात घडली आहे.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार सुरक्षा दलांच्या संयुक्त पथकाकडून परिसरामध्ये अँटी नक्षल कारवाई सुरू होती. यादरम्यान, पथकाती जवान पुढे सरकत असताना वाटेत पेरून ठेवलेल्या आयईडीचा स्फोट झाला. या स्फोटात जवान अनुज कुमार हे गंभीर जखमी झाले. सहकारी जवानांनी त्यांना तातडीने घटनास्थळावरून उपचारांसाठी सुरक्षित ठिकाणी पोहोचवले. त्यानंतर त्यांना अधिक उपचारांसाठी एअरलिफ्ट करून रांची येथे नेण्यात आले. तिथे त्यांच्यावर अधिक उपचार सुरू आहे.

या घटनेनंतर नक्षलवाद्यांनी परिसरामध्ये आणखीही काही ठिकाणी आयईडी लावले असण्याची शक्यता विचारात घेऊन संपूर्ण परिसरामध्ये सुरक्षा दलांनी शोधमोहीम अधिकच तीव्र केली आहे. तसेच सरकारने नक्षलवादाविरोधात सुरू केलेली लढाई निर्णायक टप्प्यात आळी असतानाच हा हल्ला घडल्याने तो अधिकच गंभीर मानला जात आहे. तसेच नक्षलवादी हे अद्याप कमकुवत झाले नसल्याचे आणि संधी मिळताच ते सुरक्षा दलांना लक्ष्य करत असल्याचे अशा घटनांमधून दिसून येत आहे.  

Web Title : ओडिशा-झारखंड सीमा पर नक्सली विस्फोट, एक जवान घायल

Web Summary : ओडिशा-झारखंड सीमा पर सारंडा के जंगल में नक्सलियों ने आईईडी विस्फोट किया, जिसमें एक जवान गंभीर रूप से घायल हो गया। जवान को रांची ले जाया गया। सुरक्षा बलों ने इलाके में तलाशी अभियान तेज कर दिया है।

Web Title : Naxal IED Blast on Odisha-Jharkhand Border Injures Soldier

Web Summary : An IED blast by Naxals in the Odisha-Jharkhand border's Saranda forest critically injured a soldier during an anti-Naxal operation. The soldier was airlifted to Ranchi for treatment. Security forces have intensified search operations in the area.