शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs NZ ODI: भारताचा संघ जाहीर; अय्यर IN; ऋतुराज, तिलक OUT, बुमराह-पांड्याला विश्रांती
2
Donald Trump : "आमच्या कंपन्यांना बाहेर काढलं..."; व्हेनेझुएला एअर स्ट्राईकनंतर ट्रम्प यांचा जुना Video व्हायरल
3
"ते तर आता 'लीडर ऑफ पर्यटन'"; राहुल गांधींच्या परदेश दौऱ्यावर भाजपाची बोचरी टीका
4
टीम इंडियासाठी 'गुड न्यूज'! Shreyas Iyerला 'कमबॅक'साठी BCCIची मान्यता, 'या' तारखेला खेळणार
5
बांगलादेशात हिंदूंचं जगणं कठीण! एकाला खांबाला बांधून अमानुष मारहाण, प्रकृती चिंतानजक
6
Tarot Card: स्वामींचं नाव घेत एक कार्ड निवडा आणि पुढच्या आठवड्याचे साप्ताहिक भविष्य जाणून घ्या
7
हिवाळ्यात नारळ पाणी प्यावं की नाही? लोक हमखास करतात चूक, विसरु नका ‘ही’ योग्य वेळ
8
सोलापूर: निवडणुका बिनविरोध करण्यासाठीच 'तो' मर्डर! प्रणिती शिंदेंचा भाजपावर गंभीर आरोप
9
व्हेनेझुएलात युद्धाचा भडका; अमेरिकेने राष्ट्राध्यक्षांना पत्नीसह घेतले ताब्यात,ख्रिसमसलाच होणार होती कारवाई
10
अभिनेते आशिष विद्यार्थी यांचा अपघात, भरधाव दुचाकीस्वाराने दिली धडक; पत्नीही जखमी
11
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' जन्मतारखेच्या मुली असतात निसर्गतः देखण्या आणि आकर्षक
12
Nashik: शिंदेसेनेतील अंतर्गत वाद उफळला, उमेदवाराचा पत्नीसह आत्महत्येचा इशारा, नेमकं प्रकरण काय?
13
सोन्यामध्ये ₹१९९९ ची घसरण, चांदीही चमकही झाली कमी; पाहा कशी होती आठवड्याची सराफा बाजाराची स्थिती
14
मोठी बातमी! बिनविरोध विजयी झालेल्या उमेदवारांच्या विरोधात राज ठाकरेंकडे पुरावे; प्रकरण कोर्टात जाणार
15
99th Marathi Sahitya Sammelan: संमेलनस्थळी कार्याध्यक्षांना फासले काळे, संशयित पोलिसांच्या ताब्यात-video
16
Silver Price Today: ६०% स्वस्त होणार चांदी; जाणून घ्या का म्हणताहेत एक्सपर्ट्स असं?
17
Virat Kohli पुन्हा एकदा कसोटी क्रिकेट खेळताना दिसू शकतो! Gautam Gambhir चे नाव घेत कुणी केला मोठा दावा?
18
ड्रीमी प्रपोजल! क्रिती सनॉनच्या बहिणीचा झाला साखरपुडा, प्रसिद्ध गायकासोबत बांधणार लग्नगाठ
19
चुकीच्या UPI आयडीवर पैसे पाठवले गेले? घाबरू नका, 'या' सोप्या पद्धतीने मिळवा पैसे परत
20
Nashik Municipal Election 2026 : धावपळ, उत्कंठा अन् रंगलेले माघारी नाट्य! अपक्षांच्या मनधरणीसाठी मोठी कसरत
Daily Top 2Weekly Top 5

अमित शाहांनी दिलेली 30 नोव्हेंबरची डेडलाइन; त्यापूर्वीच सुरक्षा दलांनी हिडमाला संपवले..!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 15:28 IST

Naxalite Encounter: कुख्यात नक्षलवादी माडवी हिडमा आंध्र प्रदेशातील चकमकीत ठार!

Naxalite Encounter: नक्षलवादविरोधी मोहिमेत सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. आंध्र प्रदेशातील जंगलात कुख्यात नक्षलवादी हिडमा चकमकीत ठार झाला. सुरक्षा दलांनी हे काम वेळेपूर्वीच हे पूर्ण केले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गृहमंत्री अमित शाह यांनी सुरक्षा दलांना 30 नोव्हेंबर 2025 चा अल्टीमेटम दिला होता. 

गृहमंत्री अमित शाहांनी 31 मार्च 2026 पर्यंत देशातून नक्षलवाद संपवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. या पार्श्वभूमीवर आतापर्यंत हजारो नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले असून, शेकडो जणांना ठार करण्यात सुरक्षा दलांना यश आले आहे. हिडमाच्या खात्म्यासाठी शाहांनी सुरक्षा दलांना 30 नोव्हेंबरचा अल्टमेटम दिला होता. मात्र, या अल्टीमेटमच्या 12 दिवस आधीच ही मोठी कारवाई पूर्ण करण्यात सुरक्षादलांना यश मिळाले.

हिडमावर 1 कोटींचा इनाम

मिळालेल्या माहितीनुसार छत्तीसगडच्या नक्षल प्रभावीत भागातील शेजारील  राज्यांना लागून असलेल्या सीमेवर मंगळवारी सकाळपासूनच डीआरजीचे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू होती. या चकमकीत काही नक्षलवादी मारले गेले. या नक्षलवाद्यांमध्ये माडवी हिडमा आणि त्याच्या पत्नीचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. या चकमकीमध्ये हिडमा आणि त्याच्या पत्नीसह एकूण सहा नक्षलवादी मारले गेले आहेत.

माडवी हिडमा हा बस्तरमधील नक्षलवाद्यांच्या सर्वात मोठा कमांडर होता. तसेच तो सेंट्रल टीमला सांभाळत होता. त्याच्यावर छत्तीसगडसह इतर राज्यांकडून 1 कोटी रुपयांचं बक्षीस लावण्यात आले होते. काही काळापूर्वी सुरक्षा दलांनी कर्रेगुट्टाच्या पर्वतरांगांमध्ये नक्षलवाद्यांविरोधात मोहीम हाती घेतली होती तेव्हा माडवी हिडमा पळून जाण्यात यशस्वी झाला होता. मात्र आता तो सुरक्षा दलांसोबतच्या चकमकीत ठार झाला आहे.

कोण होता हिडमा ?

हिडमाचा जन्म 1981 सोली छत्तीसगडच्या  सुकमा जिल्ह्यात झाला. तो पीपल्स लिबरेशन गुरिल्ला आर्मी (PLGA) बटालियन कमांडर होता. हिडमाला देशातील सर्वात कुख्यात नक्षलवाद्यांपैकी एक मानले जात होते. 26 हून अधिक मोठ्या नक्षली हल्ल्यात त्याचा थेट सहभाग होता. छत्तीसगडचा बस्तर, तसेच आंध्र प्रदेश, तेलंगाना, ओडिशा आणि महाराष्ट्रातील काही भागात त्याचा प्रभाव होता.

दरम्यान, हिडमाच्या मृत्यूला सुरक्षा यंत्रणा नक्षलवादाविरुद्धच्या मोहिमेतील मोठा टप्पा मानत आहेत. बस्तर प्रदेशात माओवादी हालचाली कमी होऊ लागल्या असताना ही कारवाई सरकारच्या नक्षलविरोधी धोरणासाठी निर्णायक ठरू शकते.

English
हिंदी सारांश
Web Title : Naxal Leader Hidma Eliminated Before Amit Shah's Deadline.

Web Summary : Security forces killed Naxal leader Hidma in Andhra Pradesh, ahead of Home Minister Amit Shah's November 30th deadline. Hidma, carrying a ₹1 crore reward, was a key commander involved in numerous attacks. His death marks a significant blow to Naxal operations.
टॅग्स :Amit Shahअमित शाहnaxaliteनक्षलवादीAndhra Pradeshआंध्र प्रदेश