नौदलाच्या ‘INS ब्रह्मपुत्र’ला दुरुस्तीदरम्यान लागली आग, एक कनिष्ठ नाविक बेपत्ता
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2024 23:38 IST2024-07-22T23:37:05+5:302024-07-22T23:38:02+5:30
Navy's 'INS Brahmaputra' Catches Fire: भारतीय नौदलाच्या आयएनएस ब्रह्मपुत्र या युद्धनौकेला देखभाल दुरुस्तीदरम्यान आग लागल्याची घटना समोर आली आहे. ही युद्धनौका मुंबईतील नौदलाच्या डॉकयार्डमध्ये दुरुस्तीसाठी ठेवण्यात आली होती, त्याचदरम्यान ही दुर्घटना घडली, अशी माहिती नौदलाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

नौदलाच्या ‘INS ब्रह्मपुत्र’ला दुरुस्तीदरम्यान लागली आग, एक कनिष्ठ नाविक बेपत्ता
भारतीय नौदलाच्या आयएनएस ब्रह्मपुत्र या युद्धनौकेला देखभाल दुरुस्तीदरम्यान आग लागल्याची घटना समोर आली आहे. ही युद्धनौका मुंबईतील नौदलाच्या डॉकयार्डमध्ये दुरुस्तीसाठी ठेवण्यात आली होती, त्याचदरम्यान ही दुर्घटना घडली, अशी माहिती नौदलाच्या अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, या दुर्घटनेनंतर नौदलाचा एक कनिष्ठ नाविक बेपत्ता असून, बचाव दलाकडून त्याचा शोध सुरू आहे, अशी माहिती नौदलाकडून देण्यात आली आहे.
नौदलाच्या डॉकयार्ड आणि बंदरामध्ये असलेल्या इतर जहाजांमधील तंत्रज्ञांच्या पथकांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. आता ही आग कशी लागली याचा शोध नौदलाच्या अधिकाऱ्यांकडून घेतला जात आहे. तसेच या आगीत किती नुकसान झालं, याचाही आढावा घेतला जात आहे.
दरम्यान, या दुर्घटनेची माहिती देताना नौदलाने आपल्या अधिकृत वक्तव्यामध्ये सांगितले आहे की, युद्धनौकेवरील नाविक दलाने नौदलाच्या डॉकयार्ड, मुंबई आणि बंदरातील इतर जहाजांवरील अग्निशामकांच्या मदतीने सोमवारी सकाळपर्यंत या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळवलं होतं. या दुर्घटनेमुळे ही युद्धनौका एका बाजूला झुकली आहे. तसेच सर्व प्रयत्नांनंतरही या जहाजाला सरळ स्थितीत आणण्यात अद्याप यश आलेले नाही. तसेच बेपत्ता नाविकाचा शोध सुरू आहे. त्याबरोबरच ही आग कशी लागली, याचाही तपास केला जात आहे.