Navjot Singh Sidhu writes to External Affairs Minister requesting permission to visit Pakistan for the inauguration of KartarpurCorridor | नवज्योतसिंग सिद्धू पाकिस्तानला जाणार, परराष्ट्रमंत्र्यांकडे मागितली परवानगी
नवज्योतसिंग सिद्धू पाकिस्तानला जाणार, परराष्ट्रमंत्र्यांकडे मागितली परवानगी

नवी दिल्ली : पाकिस्ताननेकर्तारपूर कॉरिडोर उद्घाटन सोहळ्यासाठी पंजाबचे माजी मंत्री आणि काँग्रेसचे नेते नवज्योतसिंग सिद्धू यांना आमंत्रण पाठवले आहे. त्यामुळे नवज्योतसिंग सिद्धू यांनी या कर्तारपूर कॉरिडोर उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांना पत्र लिहून पाकिस्तानला जाण्यासाठी परवानगी मागितली आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ या पार्टीच्यावतीने नवज्योतसिंग सिद्धू यांना कर्तारपूर कॉरिडोर उद्घाटन सोहळ्यात सामील होण्यासाठी आमंत्रण देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर पाकिस्तानचे खासदार फैसल जावेद यांनी पंतप्रधान इम्रान खान यांच्या आदेशानुसार नवज्योतसिंग सिद्धू यांच्याशी टेलिफोनवरून बातचीत केली असून 9 नोव्हेंबरला या सोहळ्यात उपस्थित होण्याचे आमंत्रण दिले आहे. 

दरम्यान, भारतातील शीख धर्मीयांसाठी महत्त्वाचा असलेला कर्तारपूर कॉरिडोर 9 नोव्हेंबरला खुला करण्यात येणार आहे. या विशेष कॉरिडोरने कर्तारपूर येथील दरबार साहिब आणि पंजाबच्या गुरुदासपूर जिल्ह्यातील बाबा नानक गुरुद्वाराला जोडले जाणार आहेत. त्याद्वारे भारतीय भाविकांना व्हिसाशिवाय पाकिस्तानातील कर्तारपूरला जाता येणार आहे. त्यासाठी केवळ एक परमिट घ्यावे लागणार आहे. कर्तारपूर साहिब गुरुद्वाराची स्थापना शिखांचे धर्मगुरू गुरूनानक देव यांनी 1522मध्ये केली होती. शीख धर्मीयांचे हे अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्र आहे. 
 

English summary :
Kartarpur Corridor : Pakistan has sent an invitation to former Punjab minister and Congress leader Navjot Singh Sidhu for the inauguration ceremony of Kartarpur Corridor. Navjot Singh Sidhu have written a letter to Jaishankar and Punjab Chief Minister Amarinder Singh for permission to travel to Pakistan.


Web Title: Navjot Singh Sidhu writes to External Affairs Minister requesting permission to visit Pakistan for the inauguration of KartarpurCorridor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.