शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

Navjot Singh Sidhu: 'कायद्याचे पालन करणार', सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर सिद्धूंची पहिली प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2022 16:12 IST

Navjot Singh Sidhu: सुप्रीम कोर्टाने नवज्योत सिंग सिद्धूंना 1988 च्या ‘रोड रेज’ प्रकरणात एका वर्षाची शिक्षा सुनावली आहे.

Navjot Singh Sidhu road rage case: पंजाब काँग्रेसचे नेते आणि माजी क्रिकेटपटू नवजोत सिंग सिद्धू यांना सुप्रीम कोर्टाने दणका दिला आहे. 34 वर्षांपूर्वी सिद्धू आणि त्यांचा मित्र कंवर सिंग संधूने केलेल्या मारहाणीत गुरनाम सिंगच्या नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी सिद्धू यांना सर्वोच्च न्यायालयाने 1 वर्षाची शिक्षा सुनावली आहे. या शिक्षेनंतर आता सिद्धूंची पहिली प्रतिक्रिया समोर आलीय.

27 डिसेंबर 1988 मध्ये घडलेल्या रोडरेज केसमध्ये सर्वोच्च न्यायालयने आज निर्णय दिला. जस्टिस ए एम खानविलकर आणि जस्टिस एस के कौल यांच्या खंडपीठासमोर सुनावनी झाली. त्यांनी सिद्धूंना एका वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. या निर्णयानंतर नवज्योत सिद्धूंची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. सिद्धूंनी ट्विट करत कायद्याचे पालन करणार असल्याचे म्हटले आहे.

तत्पूर्वी पंजाब-हरियाना उच्च न्यायालयाने सिद्धूला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात तीन-तीन वर्षांचा तुरुंगवास ठोठावला होता. पण, नंतर सर्वोच्च न्यायालयाने सिद्दूंची या आरोपातून मुक्तता केली. सर्वोच्च न्यायालयाच्या त्या निर्णयानंतर मृताच्या नातेवाईकांनी रिव्हू पिटीशन दाखल केली होती. त्यावर निकाल देताना आज न्यायालयाने सिद्धूंना शिक्षा सुनावली आहे. 

नेमकं काय घडलं होतं?27 डिसेंबर 1988 मध्ये ही घटना घडली होती. सिद्धूने पटियालामध्ये रस्त्याच्या मधोमध जिप्सी पार्क केली होती. या मार्गावरून मृत 65 वर्षीय व्यक्ती आणि अन्य दोघे बँकेत पैसे काढण्यासाठी जात होते. यावेळी त्यांनी सिद्धूला गाडी बाजुला घेण्यास सांगितले. यातून वाद झाला. सिद्धू आणि त्याच्या सहकाऱ्याने त्या व्यक्तीला मारहाण केली. या मारहाणीत एकाचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी आरोप केला होता की, सिद्धू हे मारहाण करून पसार झाले होते. 

टॅग्स :Navjot Singh Sidhuनवज्योतसिंग सिद्धूcongressकाँग्रेसSupreme Courtसर्वोच्च न्यायालय