शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

Navjot Singh Sidhu : नवज्योत सिंग सिद्धूंच्या मनात नक्की काय?; भगवंत मान यांचं कौतुक करत म्हणाले, "नव्या युगाची सुरूवात..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2022 14:31 IST

पंजाब काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा नवज्योत सिंग सिद्धू यांनी राजीनामा दिला. त्यानंतर आता त्यांनी हे ट्वीट केल्यानं सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत. 

आम आदमी पक्षाचे (AAP) नेते भगवंत मान (Bhagwant Mann) यांनी बुधवारी पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाची जंगी सोहळ्यात पंजाबी भाषेत शपथ घेतली. शहीद भगतसिंग यांच्या खटकड कलान या मूळ गावी झालेल्या या समारंभाला आपचे हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. "मी एकही दिवस वाया न घालविता जनतेच्या हिताचे निर्णय घेईन. राज्यामधील बेकारी व भ्रष्टाचार संपविण्यासाठी अथक प्रयत्न करेन," असं आश्वासन भगवंत मान यांनी जनतेला दिले. यानंतर, गुरूवारी नवज्योत सिंग सिद्धू यांनी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचं कौतुक करत नव्या युगाची सुरूवात असल्याचं म्हटलं.

"तिच सर्वात नशीबवान व्यक्ती असते, ज्याच्याकडू कोणती अपेक्षा नसते. भगवंत मान यांनी पंजाबमध्ये एक अँटी माफिया युगाची सुरूवात केली आहे. ते अपेक्षांची पूर्ताता करतील अशी आशा आहे आणि पंजाबला पुन्हा विकासाच्या मार्गावर आणतील. लोकांना ध्यानात ठेवूनच ते धोरणं राबवतील अशी त्यांच्याकडून अपेक्षा आहे," असं सिद्धू म्हणाले. पंजाब काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा नवज्योत सिंग सिद्धू यांनी राजीनामा दिला. त्यानंतर आता त्यांनी हे ट्वीट केल्यानं सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत. सिद्धूंचा राजीनामापंजाब काँग्रेसमधील जवळपास आठ महिन्यांच्या राजकीय नाट्यानंतर नवज्योत सिंग सिद्धू यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांनी राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांचे राजीनामे मागितले होते. त्यानंतर सिद्धूंनी ट्वीट करत जशी काँग्रेसच्या अध्यक्षांची इच्छा आहे, मी आपला राजीनामा पाठवला आहे, असं ट्वीट केलं होतं.

स्वीकारली मुख्यमंत्रीपदाची सूत्रंपंजाब विधानसभा निवडणुकांमध्ये आपने काँग्रेस व अन्य पक्षांचा दणदणीत पराभव केला होता. भगवंत मान यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर एक जाहीर सभा झाली. त्यात मान म्हणाले की, मी माझ्या कामाला लगेचच सुरुवात करणार आहे. उत्तम काम करण्यासाठी आधीच ७० वर्षे उशीर झाला आहे. या शपथविधीनंतर भगवंत मान यांनी चंदीगड येथे मुख्यमंत्री कार्यालयात जाऊन सूत्रे स्वीकारली व कामाला प्रारंभ केला.

टॅग्स :congressकाँग्रेसAAPआपBhagwant Mannभगवंत मानNavjot Singh Sidhuनवज्योतसिंग सिद्धू